RSS worker shot dead:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या, देशभरात संतापाचं वातावरण

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक खळबळजनक घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Punjab News : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक खळबळजनक घटना घडली. बुधवारावाला परिसरात दोन अज्ञात हल्लेखोरांनी ४० वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नवीन अरोरा यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते घरी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. या हत्येमुळे स्थानिक व्यापारी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कुटुंबाची वाईट अवस्था

नवीन अरोरा यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांवर शोककळा पसरली आहे. नवीन अरोरा यांचे कुटुंब दुःखात आहे. मृताचे वडील बलदेव यांनी सांगितले की, नवीन त्यांच्या दुकानातून घरी परतत असताना दोन अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नवीन यांना दोन लहान मुलं आहेत. घटनेची माहिती मिळताच फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग आणि आमदार रणबीर सिंग भुल्लर घटनास्थळी पोहोचले. एसएसपींनी सांगितले की, हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत आणि लवकरच अटक केली जाईल. पोलीस सीसीटीव्ही फुटेजाच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत.

नक्की वाचा - Kalyan News : 'तो' डॉक्टर गप्पा मारत बसला, रूग्ण तडफडत राहिला, कल्याणच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना

कुटुंबाचा संघाशी संबंध

माहितीनुसार, नवीन अरोरा यांचे दिवंगत आजोबा दीना नाथ हे संघाचे फिरोजपूर शहर प्रमुख होते. नवीन आणि त्यांचे वडील देखील संघाशी संबंधित होते. व्यापार मंडळाचे अध्यक्ष अश्वनी मेहता म्हणाले की, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी आणि घटनेमागील हेतू तपासावा अशी मागणी केली आहे. एसएसपी भूपिंदर सिंग म्हणाले, "हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

Advertisement