Crime News : त्यानं 11 जणांना लिफ्ट दिली, सर्वांची हत्या केली आणि मृताच्या पाठीवर लिहिलं 'धोकेबाज'

Crime News : 18 महिन्यांच्या कालावधीत 11 जणांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अखेर अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
एका 37 वर्षांच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात आरोपीला सुरुवातीला अटक करण्यात आली होती.
मुंबई:

18 महिन्यांच्या कालावधीत 11 जणांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अखेर पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राम स्वरुप (33 वर्ष) असं या आरोपीचं नाव आहे. तो होशियारपूर जिल्ह्यातल्या चौरा जिल्ह्यातली रहिवाशी आहे. त्याला मंगळवारी रुपनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं सर्व पुरुषांची हत्या केली आहे. या सर्वांसोबत त्यानं लैंगिक कृत्य केली होती. आरोपीनं या सर्वांना लिफ्ट दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडं पैसे मागितले. संबंधित व्यक्तीनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झालीय. या प्रकरणातील बहुतेक खटल्यात आरोपीनं पीडितांना कपड्याच्या तुकड्याने गळा कापला. तर काही प्रकरणात पीडित त्यांना डोक्याला झालेल्या दुखापतीमध्ये मृत्यू पावले, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.  

एका प्रकरणात आरोपीनं हत्या केल्यानंतर मृत व्यक्तीच्या पाठीवर धोकेबाज असं लिहिलं होतं. त्यानं खासगी कारखान्यात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्यानंतर त्यांच्या पाठीवर धोकेबाज असं लिहिलं होतं. 

( नक्की वाचा : Kalyan News : स्मशानभूमीची आरक्षित जमीन दडपण्याचा बिल्डरचा प्रयत्न, वाचा कसा झाला पर्दाफाश? )
 

कसा झाला उलगडा?

स्वरुपला सुरुवातीला एका 37 वर्षांच्या तरुणाच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. मृत व्यक्ती मोद्रामधील टोल प्लाझाजवळ चहा आणि पाणी विकत असे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यानं आणखी 10 जणांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यामधील पाच हत्येची पृष्टी अद्याप झाली आहे. अन्य प्रकरणाचा तपास सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं. रुपनगर, होशियारपूर आणि फत्तेनगर या तीन जिल्ह्यातील व्यक्तींची त्यानं हत्या केली आहे. 

Advertisement

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मजुरीचं काम करत होता. त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. या सीरियल किलरनं दिलेल्या माहितीनुसार, तो हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाया पडून त्यांच्याकडं केलेल्या गुन्ह्याची माफी मागत असे. आपण हे सर्व कृत्य नशेत केले आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला काही आठवत नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : जज साहेब मला मोकळे करा, आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली चप्पल )
 

आरोपी विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत. पण, त्याचं व्यसन आणि समलैंगिकतेमुळे दोन वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी त्याच्याशी नातं तोडलं होतं. आरोपीला अटक करण्यात आलं असून त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article