Nagpur News : नागपूरमध्ये मशीद आणि मदरशाजवळ लागले QR कोड, ATS च्या तपासात काय संशय?

नागपूरमध्ये मशीद आणि मदरशामध्ये क्यूआर कोड (QR Code) लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपूरमध्ये मशीद आणि मदरशामध्ये क्यूआर कोड (QR Code) लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा क्यूआर कोड एका व्यक्तीच्या खासगी बँक खात्याशी संलग्न असल्याचे आढळून आले आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलिस ठाण्यांतर्गत कामगार नगर जवळच्या कमर कॉलनी परिसरातील ही घटना आहे. 

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळांवर क्यूआर कोड्स आढळल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) दिलीय. या प्रकारामागे अवैध फंडिंगचा प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरात नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोहम्मद एजाझ अंसारी नावाच्या एका व्यक्तीच्या खात्याचा हा क्यूआर कोड आहे. पश्चिम नागपूरमधील छावणी परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेतील शाखेतील  खात्यासोबत हे कोड संलग्न असल्याचे तपासात स्पष्ट झालं आहे.

मशिदीत जाणाऱ्या काही मुस्लिम नागरिकांना  हा प्रकार कळताच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली.  प्राथमिक दृष्ट्या मुलींसाठी नवा मदरसा स्थापित करण्याच्या उद्देशाने निधी संकलन करण्यात येत होते, असे सांगण्यात आले आहे. कपिल नगर पोलिसांनी मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या लोकांशी संपर्क साधला असून त्यांना माहिती देण्यासाठी पाचारण केले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार )
 

आता ते क्यू आर कोड काढून टाकण्यात आले असले तरी पोलिसांनी सदर बँकेशी संपर्क साधला आहे. हा कोड कुणी आणि कधी लावला?  मशीद व्यवस्थापन समितीच्या बँक खात्याशी ते कोड संबंधित कां नाही? मशीद आणि मदरसाच्या व्यवस्थापन कमिटीशी मोहम्मद एजाझ अंसारीचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम नागपूरच्या कपिल नगर पोलिसांसमोर आहे. 

संबंधित खात्यात या कोडद्वारे किती रक्कम जमा करण्यात आली ? ती रक्कम पुढे कुठे वळती करण्यात आली किंवा कुठे खर्च करण्यात आली, या सर्व बाबींची माहिती पोलीस गोळा करत आहेत. 

Advertisement

नागपूरला दंगलीचं गालबोट

राज्यातील एक शांत शहर या नागपूरच्या ओळखीला यावर्षी गालबोट लागलं. 17 मार्च रोजी नागपुरात दोन गटांमध्ये संघर्ष झाला. शहरातील भालदारपुरा भागात 80-100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला.  त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर आणि सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले होते. 

त्यापूर्वी राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याचा विषय पेटला होता.   हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूर शहरामध्ये वादाचा भडका उडाला. दोन गटात दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. 

Advertisement
Topics mentioned in this article