Raigad Cyber Crime: 11 आरोपी, 6 हजार सीमकार्ड अन् 35 लॅपटॉप, रायगडमध्ये सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश

महत्‍वाचे म्‍हणजे यात मोबाईल सर्व्हिस पुरवणारया एका कंपनीतील दोन अधिकारयांचाही समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमादार, रायगड:

Raigad Cyber Crime: डिलीटल अरेस्टच्‍या रायगडमधील पहिल्‍याच गुन्‍हयाची उकल करण्यात आली असून ११ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींमध्ये मोबाईल सर्व्हीस पुरवणाऱ्या कंपनीचे अधिकारी असल्याचेही समोर आले आहे. त्यांच्याकडून 6 हजारांहून अधिक सीमकार्ड, 35 मोबाईल, लॅपटॉप हस्‍तगत करण्यात आले आहेत. रायगड पोलिसांच्या सायबर सेलने ही मोठी कामगिरी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डिजीटल अरेस्टची भीती दाखवून लोकांना लुबाडणारया टोळीचा रायगड पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नेपाळसह  देशाच्‍या विविध भागातून 11 आरोपींना बेडया ठोकल्‍या आहेत. महत्‍वाचे म्‍हणजे यात मोबाईल सर्व्हिस पुरवणारया एका कंपनीतील दोन अधिकारयांचाही समावेश आहे.

Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?

रायगड जिल्‍हयातील एका वृदधाला मनीलॉंड्रीग केसची भीती दाखवत त्‍याच्‍याकडून 66 लाख रूपये उकळण्‍यात आले होते. जिल्‍हयातील पहिल्‍याच दाखल गुन्‍हयाचा तपास करताना हे आरोपी पोलीसांच्‍या हाती लागले आहेत. पोलीसांनी आरोपींकडून 35 मोबाईल हँडसेट, 6 हजार 175 सीमकार्ड, 3 लॅपटॉप, एक व्‍हीपीएन स्‍वीचपोर्ट, 1 आयपॅड, 5 रबरस्‍टँप हस्‍तगत केले आहेत.

 त्‍यांची 112 बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत. आरोपी केवळ भारतच नव्‍हे तर पाकीस्‍तान, बांगलादेश, कॅनडा, नेपाळ, चीन मधील नागरीकांच्‍याही संपर्कात होते. यामुळे अशा प्रकारच्‍या देशविदेशातील अनेक गुन्‍हयांची उकल होण्‍यात मदत होणार आहे.

Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!