मेहबूब जमादार
सुरजसिंह चौहान हा जवान नौदलात कार्यरत होते. ते कुलाब्यातील डॉकयार्ड इथं सेवेत होते. पण गेल्या आठवड्यापासून ते गायब होते. त्यांचा काही पत्ता लागत नव्हता. शिवाय त्यांचा फोनही लागत नव्हता. ते कुलाब्यात नेव्ही नगरमध्ये राहात होते. पण 7 सप्टेंबरपासून ते रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले. या जवानाची 29 मे रोजी मुंबईच्या एफ टीटीटी विभागात नेमणूक झाली होती. आठ दिवसांपुर्वी हा जवान अचानक गायब झाला. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आले.
सदर जवानाचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपूरी रोड स्टेशन परिसरातील दिसून आले. या बेपत्ता जवानाचा शोध सुरू झाला. नेरळ पोलिसांसह नौदल ही या शोध मोहीमेत सहभागी झाले. नातेवाईकांनीही नौदल व नेरळ पोलीसांच्या पथकां बरोबर होते. यावेळी नेरळ माथेरानचा संपूर्ण जंगल भाग पिंजून काढण्यात आला. पण ठोस काही हाती लागत नव्हते. पण काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. कर्जत ते नेरळ दरम्यान माथेरानच्या खालच्या पाली भूतवली धरण जवळील जंगल परिसरात एक मृतदेह आढळला आहे.
सातोबा मंदिरच्या पाठीमागील टेकडीवरुन 50 फूट खोल दरीत हा मृतदेह असल्याचे आढळून आला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व सह्याद्री रेस्क्यू टीम सदर मृतदेह काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या जंगल परिसरात रहिवाशी क्षेत्र नसल्याने टेकड्याच्या रांगा मधुन त्या ठिकाणी पोहचणे कठीण आहे. त्यातून मार्ग काढत रेस्क्यू टीम त्या मृतदेहा जवळ पोहोचली आहे. शिवाय मृतदेह सुरज सिंह चौहान याचाच असल्याचं ही आता पोलिस आणि रेस्क्यू टीमने कन्फर्म केलं आहे.
सुरज सिंह चौहान हे सात सप्टेंबरला घरातून बाहेर निघाले होते. सकाळी पाचच्या सुमारास ते बाहेर पडले होते. काही वेळा नंतर त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाचे अधिकारी हादरले. त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात सुरज यांच्या बेपत्ता झाल्याची
तक्रार नोंदवली. सुरजसिंग अमरपालसिंग चौहान हे मुळचे राजस्थानचे राहाणारे आहेत. त्याचं वय 33 वर्ष आहे. त्यांच्या मृ्त्यूने कुटुंब ही हादरून गेले आहे. आता हा अपघात होता की घातपात याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.