Crime News: नराधम बाप.. पोटच्या लेकीवर 12 वर्ष अत्याचार; कोर्टाने सुनावली भयंकर शिक्षा

उत्तराखंडमधील डेहराडून येथील न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली तसेच 25,000 चा दंडही ठोठावला आहे. स्वतः मुलीनेच आपल्या पित्याच्या विकृत कृत्याचा भांडाफोड केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Chhattisgarh News:  हवाई दलात काम करणाऱ्या नराधम पित्याने पोटच्या लेकीवर १२ वर्ष अत्याचार केल्याची संतापजनक आणि बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्तीसगमधील रायपूर येथे घडली. या नराधमाला उत्तराखंडमधील डेहराडून येथील न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली तसेच 25,000 चा दंडही ठोठावला आहे. स्वतः मुलीनेच आपल्या पित्याच्या विकृत कृत्याचा भांडाफोड केला.

नराधम बाप.. पोटच्या लेकीचे लचके तोडले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना छत्तीसगडमधील रायपूर येथील आहे. रायपूर येथे 2023 मध्ये आपल्याच हवाई दलात काम करणाऱ्या पतीविरोधात मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. मुलगी ५ वर्षांची असल्यापासून ती 17 वर्षांची होईपर्यंत नराधम पिता तिच्यावर अत्याचार करत होता. मुलगी 17 वर्षाची झाल्यानंतर तिला आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव झाली आणि पित्याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले.

Pune News: 'त्या' दोघींनी स्वप्नातही विचार केला नसेल असं त्यांच्या सोबत घडलं, एकाच वेळी सख्ख्या बहिणींना...

न्यायालयीन सुनावणीदरम्यान, पीडितेने सांगितले की तिच्या वडिलांनी गुजरातमधील मथुरा आणि देहरादून येथेही तिच्यावर बलात्कार केला होता. तब्बल 12 वर्ष हा प्रकार सुरु होता. पीडिता १७ वर्षांची झाल्यावर तिचा संयम तुटला आणि तिने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आईने हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला. न्यायालयाने तिच्या मुलीवरील बलात्काराचे वर्णन अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, तो विकृत मानसिकता आणि लैंगिकतेचे उदाहरण असल्याचे म्हटले. तसेच राज्य सरकारला पीडितेला तीन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

कोर्टाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा

अशा गुन्ह्यांचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर खोल आणि नकारात्मक परिणाम होतो आणि अशा कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला लाजिरवाणे वाटते, असेही न्यायालयाने म्हटले. सुनावणीदरम्यान, बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की वैद्यकीय अहवालात पीडितेच्या शरीरावर कोणत्याही जखमांचे चिन्ह आढळले नाही आणि तिचे हायमेन शाबूत आहे, म्हणजेच बलात्कार झाला नाही. तथापि, न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. विशेष न्यायाधीश अर्चना सागर यांनी असा निर्णय दिला की पीडितेची साक्ष विश्वासार्ह आहे आणि कोणतीही मुलगी तिच्या स्वतःच्या वडिलांवर असे गंभीर आणि खोटे आरोप करणार नाही.

Advertisement

न्यायालयाने असेही नमूद केले की पीडिता मोठी होत असताना, तिला तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव होऊ लागली. बराच काळ ती भीतीमुळे गप्प राहिली, परंतु अखेर सत्य बाहेर आले. पीडितेचे दोन लहान भाऊ गंभीर आजारांशी झुंजत होते. एक भाऊ रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे, तर दुसरा देखील आजारी आहे. मुलांच्या उपचारांमुळे आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे आई आणि मुलीने दीर्घकाळ अत्याचार सहन केले. अखेर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी  मुलीने तिच्या आईला संपूर्ण सत्य सांगण्याचे धाडस केले त्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि आरोपी वडिलांना शिक्षा झाली.

Tragic Death : बापाचा शेवटचा संघर्ष! रक्ताच्या थारोळ्यातून मुलीला केला कॉल, दुर्दैवी अंत वाचून डोळे पाणावतील