जाहिरात

Pune News: 'त्या' दोघींनी स्वप्नातही विचार केला नसेल असं त्यांच्या सोबत घडलं, एकाच वेळी सख्ख्या बहिणींना...

ऋतुजा पांडुरंग शिंदे आणि नेहा पांडुरंग शिंदे या दोघी सख्ख्या बहिणी होत्या.

Pune News: 'त्या' दोघींनी स्वप्नातही विचार केला नसेल असं त्यांच्या सोबत घडलं, एकाच वेळी सख्ख्या बहिणींना...
  • पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरात दोन तरुण सख्ख्या बहिणींवर भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली
  • या अपघातात ऋतुजा पांडुरंग शिंदे आणि नेहा पांडुरंग शिंदे या बहिणींचा जागीच मृत्यू झाला
  • दोघी पुण्याच्या पुनावळेच्या रहिवासी असून त्या आपल्या टू व्हीलरवरून जात होत्या
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

आपल्या सबोवताली अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे आपण ही सुन्न होवून जातो. अशी एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरात घडली आहे. इथं दोन तरुण सख्ख्या बहिणींवर एकाच वेळी काळाने घाला घातला. त्यांनी याचा कधी विचार ही केला नसेल की आपल्या सोबत असं काही होईल. त्यांची काही चुक नसताना ही त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे या दोघींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर तर आभाळ कोसळले आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमी त्यांच्या आईवडीलांच्या पायाखालची वाळूच सरकली.  

 ऋतुजा पांडुरंग शिंदे आणि नेहा पांडुरंग शिंदे या दोघी सख्ख्या बहिणी. एकीच वय 24 वर्ष तर दुसरीचं वय अवघं 20 वर्षे. दोघी ही पुण्याच्या पुनावळेच्या राहाणाऱ्या. दोघी ही नेहमी प्रमाणे आपल्या टु व्हीलरवरून बाहेर पडल्या होत्या. त्यांना पुढे काय होणार आहे याची पुसटती ही कल्पना नव्हती. त्या आपली गाडी आपल्या लाईनमध्ये चालवत होत्या. त्यांचा स्पिड ही जास्त नव्हता. त्याच वेळी त्यांच्या मागून एक आयशर ट्रक आला. त्यांना काही कळण्याच्या आत या भरधाव ट्रकने त्यांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक जबरदस्त होती. 

नक्की वाचा - BMC Election 2026: मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पाठिंबा कुणाला? महाविकास आघाडी की महायुती?

ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे त्या दोघी ही त्यांच्या टू व्हीलरवरून उडाल्या. दोघींच्याही डोक्याला जबर मार लागला. काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या या दोन तरुण बहिणींचा जागीच मृत्यू झाला.  ऋतुजा पांडुरंग शिंदे आणि नेहा पांडुरंग शिंदे  अशी मृत तरुणींची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक जितेंद्र निराले याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. 

नक्की वाचा - Pune News: 'रक्ताचे पाठ सांडू पण प्रकल्प होऊ देणार नाही' पुरंदरनंतर 'या' प्रकल्पाला ही शेतकऱ्यांचा विरोध

काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक नागपूरवरून आला होता. या ट्रकमध्ये वाटाणा आणला होता. तो ट्रक रिकामा केल्यानंतर तो परतीचा प्रवास करत होता. त्याच वेळी त्याने मागून या दुचाकीला धडक दिली. त्याच या दोन ही सख्ख्या बहीणींचा जागेवरच मृत्यू झाला. सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com