Raja Raghuvanshi : 25 दिवसांमध्ये 119 कॉल... 'बेवफा' सोनम केसला नवं वळण, कोण आहे संजय वर्मा?

Raja Raghuvanshi Murder Case : सध्या देशभर गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sonam Raghuvanshi : सोनमनं संजय वर्माला 119 कॉल केले होते.
मुंबई:

Raja Raghuvanshi Murder Case : सध्या देशभर गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशी एका संशयित व्यक्ती, संजय वर्मा, सोबत अनेक तास फोनवर बोलत होती, अशी माहिती मेघालय पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संजय वर्माचा फोन सध्या स्विच ऑफ आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 1 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये सोनमने संजय वर्माला तब्बल 119 वेळा फोन केला होता. तर, एका महिन्यात एकूण 234 वेळा संजय आणि सोनम यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं. आता संजय कोण आहे आणि राजा रघुवंशीच्या प्रकरणात त्याची काय भूमिका आहे? याचा तपास पोलिसांनी सुुरु केला आहे. राजा रघुवंशीती 23 मे रोजी मेघालयमधील शिलाँगमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत राजाची पत्नी सोनमसह 5 जणांना अटक केली आहे.

Advertisement

मेघालय पोलीस इंदूरमध्ये दाखल

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात शिलाँग पोलिसांचं पथक राजा आणि सोनमच्या गावात इंदूरमध्ये पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी राजाच्या कुटुंबीयांशी बोलून सोनमचे वागणे आणि लग्नानंतर तिने इंदूरमध्ये घालवलेल्या दिवसांची माहिती घेतली. पोलीस पथकातील तीन अधिकाऱ्यांनी राजा रघुवंशीचे भाऊ विपिन रघुवंशी आणि त्यांच्या आईचीही चौकशी केली. चौकशीनंतर विपिनने सांगितलं की, 'तीन अधिकारी आमच्या घरी आले होते. त्यांनी फक्त एवढीच माहिती घेतली की सोनम लग्नानंतर आमच्या घरी चार दिवस राहिली असताना तिचं वागणं कसं होतं आणि तिचं घरातील सदस्यांशी काय बोलणं झालं.

Advertisement

विपिनने पुढे सांगितलं की, 'मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, आम्ही सोनमचे दीर आहोत, त्यामुळे आम्ही कधीही तिच्याशी थेट बोललो नाही किंवा तिच्यासमोरही गेलो नाही. मी त्यांना सांगितलं की आम्ही सोनमला फारसं पाहिलंही नाही, त्यामुळे तिचं वागणं कसं होतं याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही.'

Advertisement

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )
 

2 जून रोजी सापडला राजाचा मृतदेह

2 जून रोजी सोनमचा पती राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील रियात अर्लियांगमधील वेई सवाडोंग पार्किंगच्या खाली एका खोल दरीत सापडला होता. पतीचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांनी, सोनमने 7 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तिला रस्त्याने पाटणा, मग कोलकाता आणि नंतर गुवाहाटीला नेण्यात आलं. गुवाहाटी विमानतळावरून तिला शिलाँगच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इतर चार आरोपींनाही शिलाँगला आणण्यात आलं होतं. 11 जून रोजी सर्व आरोपींना शिलाँग जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली..

न्यायालयात हजर करण्यापूर्वी सोनमने तिचा पती राजा रघुवंशीच्या मृत्यूमधील सहभाग मान्य केला. आपली भूमिका मान्य केली. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाह सोबत समोरासमोर चौकशी केली होती. त्यावेळी सोनमनं तिचा गुन्हा कबूल केला.