जाहिरात

Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं?

Raja Raghuvanshi Murder Case : सोनम आणि राज कुशवाहा यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. याबाबतच्या काही वृत्तानुसार, सोनम आणि राजच्या नात्याची माहिती सोनमच्या कुटुंबियांना होती.

Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं?
Raja Raghuvanshi Murder Case: सोनम आणि राज कुशवाहाचा एकत्र पहिला फोटो
मुंबई:

इंदूरच्या राजा रघुवंशी यांच्या हत्येचे प्रकरण  (Raja Raghuvanshi Murder Case) सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. राजा रघुवंशीच्या हत्येचा आरोप त्यांची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिच्यावर आहे. पोलिसांच्या तपासात सोनमने गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. सोनमने ज्या राज कुशवाहासाठी पती राजाला संपवलं, त्याच्यासोबतचा सोनमचा एक फोटो आता समोर आला आहे. सोनम आणि राज कुशवाहा यांचा हा एकत्र असलेला पहिला फोटो आहे, जो माध्यमांमध्ये आला आहे. हा फोटो सोनमच्या लग्नापूर्वीचा आहे. फोटोमध्ये दोघेही एकत्र एका खुर्चीवर बसलेले दिसत आहेत आणि खूप आनंदी आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध

सोनम आणि राज कुशवाहा यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. याबाबतच्या काही वृत्तानुसार, सोनम आणि राजच्या नात्याची माहिती सोनमच्या कुटुंबियांना होती. त्यामुळे त्यांनी सोनम आणि राजाचे लग्न घाईघाईने लावून दिले. लग्नानंतर दोघे हनीमूनसाठी मेघालयला गेले आणि तिथे ते बेपत्ता झाले. अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. राजाचा मृतदेह सापडल्यानंतरही सोनम अनेक दिवस बेपत्ता होती. अखेर तिने उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केले.

त्यानंतर झालेल्या पोलिसांच्या तपासात या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. सोनमने तिचा प्रियकर राजसोबत मिळून पती राजा रघुवंशीची हत्या केली. आता सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर तीन गुंड मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi : 'माझी बहीण गुन्हेगार' राजाच्या आईचे पाय धरत सोनमच्या भावाचा मोठा निर्धार )
 

सोनम आणि राज कुशवाहाच्या प्रेमकहाणीची सुरुवात कशी झाली?

सोनमचे माहेर इंदूरमधील गोविंद नगर खारचा भागात आहे. सोनमचे कुटुंब फर्निचरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सनमायका शीटच्या व्यवसायाशी संबंधित आहे. राज कुशवाहा त्यांच्याच कंपनीत काम करत होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोनम वडिलांना मदत करण्यासाठी ऑफिसमध्ये जात असे. याच काळात तिची राजसोबत मैत्री झाली.

सर्वांसमोर भाऊ-बहीण, पाठीमागे वेगळेच

राज कुशवाहा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तो सर्वांसमोर सोनमला 'दीदी' म्हणायचा, पण पाठीमागे त्यांच्यात वेगळेच काहीतरी सुरू होते. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की, सोनम राजला 'भाऊ' म्हणायची. सोनमने तब्बल तीन वर्षे राजला राखीही बांधली होती. सोनमचा भाऊ गोविंदने ही माहिती दिली आहे.

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )
 

राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारातही राज कुशवाहा उपस्थित

सोनमचा प्रियकर, संपूर्ण सत्य माहीत असूनही, बराच काळ पोलिस आणि कुटुंबियांना दिशाभूल करत होता. धक्कादायक बाब म्हणजे राज कुशवाहा राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारातही गेला होता. तो राजाच्या अंत्यसंस्कारावेळी सोनमच्या वडिलांना आधार देतानाही दिसला होता.

सोनमच्या माहेरच्या जवळ राहणाऱ्या लक्ष्मण सिंह राठोड यांनी सांगितले की, राजा रघुवंशीचा मृतदेह 4 जून रोजी मेघालयहून आला होता. त्यावेळी सोनमच्या कुटुंबाने अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी चार-पाच वाहनांची व्यवस्था केली होती. त्यांनीच ही माहिती दिली की राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारात राज कुशवाहाही सामील होता.

त्यांनी सांगितले, 'मी ज्या वाहनात बसून अंत्यसंस्कारस्थळी गेलो, ते वाहन राजच चालवत होता. त्यावेळी माझी त्याच्याशी काही खास बोलणे झाले नाही. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्याची अटक झाल्यानंतर जेव्हा मी माध्यमांमध्ये त्याचा फोटो पाहिला, तेव्हा मला आठवले की हाच माणूस मला अंत्यसंस्कारस्थळापर्यंत घेऊन गेला होता.'
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com