Raja Raghuvanshi Sonam Raghuvanshi Case: मेघालयात हनिमूनसाठी गेलेले राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून सोनम रघुवंशीला अटक केली आहे. सोनम रघुवंशी ही गाझीपूरमधील एका ढाब्यातून सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजा आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न 11 मे रोजी इंदूरमध्ये झाले. लग्नाच्या बरोबर नऊ दिवसांनी, 20 मे रोजी, दोघेही हनिमूनसाठी मेघालयात पोहोचले. तेव्हापासून या दोघांचा शोध सुरु होता. 3 जून रोजी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. गेल्या 16 दिवसांपासून पोलीस याप्रकरणी तपास करत होते.
अखेर आता सोनम रघुवंशीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गाजीपूरमधील एका ढाब्यावरुन सोनमने कुटुंबियांना फोन केला होता. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली अन् तिला पकडण्यात आले. घालयच्या डीजीपींनी दावा केला आहे की त्या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की पत्नी हत्येत सहभागी होती, तिने सुपार देऊन मारेकऱ्यांना बोलावले होते.
पोलीस या खळबळजनक प्रकरणाचा 16 दिवसांपासून सतत तपास करत होते, त्यानंतर आता एक मोठी कारवाई समोर आली आहे. मेघालयच्या डीजीपींनी दावा केला आहे की त्या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की पत्नी हत्येत सहभागी होती, तिने भाडोत्री मारेकऱ्यांना बोलावले होते. सध्या गाजीपूर पोलिसांनी इंदूर पोलिसांना कळवले आहे. त्यानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आले. इंदूर पोलिस गाझीपूरला पोहोचत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही ट्विट केले आहे. इंदूरच्या राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्याची मोहीम अजूनही सुरू आहे, असं त्यांनी म्हटले आहे.