Shocking News: नात्यांना कलंक! आईने नकार दिला आणि मुलाने तिची कवटी फोडली; संपूर्ण गाव स्तब्ध

प्रत्येक मुलासाठी त्याची आई ही आयुष्यभराचं सुरक्षिततेचं कवच असते. पण  मुलाच्या हातून आपल्या मुलाची क्रूरपणे हत्या होते, तेव्हा माणुसकी आणि नात्यांचा अर्थच हरवल्यासारखं वाटतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Shocking News: आईची हत्या करुन फरार झालेल्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई:

प्रत्येक मुलासाठी त्याची आई ही आयुष्यभराचं सुरक्षिततेचं कवच असते. पण  मुलाच्या हातून आपल्या मुलाची क्रूरपणे हत्या होते, तेव्हा माणुसकी आणि नात्यांचा अर्थच हरवल्यासारखं वाटतं. राजस्थानमधील नारायणपूर उपखंडात अशीच एक काळजाला कंप देणारी घटना घडली आहे, जिथे लग्नाच्या हट्टामुळे एका बेरोजगार मुलाने क्रूरतेची हद्द पार करत आपल्या आईला संपवलं. आईचा जीव निसून जाईपर्यंत तिच्या डोक्यावर एकापाठोपाठ एक निर्दयी वार त्याने केले.

का केली हत्या?

या भयंकर हत्येमागील आरोपी मुलाचं नाव राहुल शर्मा (वय 28) आहे. राहुलने आयटीआय (ITI) पर्यंत शिक्षण घेतलं होतं, पण तो अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. तो सतत आपले आई-वडील, कमला देवी आणि 70 वर्षांचे सूरजभान शर्मा, यांच्यावर लग्न लावून देण्यासाठी दबाव टाकत होता. याच हट्टामुळे राहुलचं त्याची आई कमला देवी यांच्यासोबत दररोज वाद होत होते.

( नक्की वाचा : Triple Murder नीलगाय नव्हे, कुटुंब पुरले! वन अधिकाऱ्याने कशी आणि का केली पत्नी-मुलांची हत्या, वाचा थरारक कहाणी )
 

मंगळवारी रात्री, सुमारे 8 वाजता, आई-वडील खोलीत बसले असताना, बाहेरून राहुलच्या शिवीगाळीचा आवाज आला. हा सामान्य वाद काही क्षणांतच टोकाला गेला. 

वाद विकोपाला गेला, तेव्हा कमला देवी खोलीतून पळून बाहेर जाऊ लागल्या. पण अंधारामुळे त्या ठेच लागून जमिनीवर पडल्या. त्याचवेळी, रागाने वेड्या झालेल्या राहुलने जवळच खाट उचलली. जमिनीवर पडलेल्या आणि बचावासाठी धडपडणाऱ्या आईच्या डोक्यावर त्याने एकापाठोपाठ एक निर्घृण वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचे वार इतके भयंकर होते की कमला देवींची कवटी फुटून आत दबली. आईचा जीव निघून जाईपर्यंत त्याने वार करणं थांबवलं नाही. या अमानुष हत्येनंतर तो कलियुगी मुलगा राहुल घटनास्थळावरून लगेच पळून गेला.

Advertisement

घटनास्थळावर रक्ताचा मोठा डाग आणि तुटलेल्या बांगड्या हा हल्ला किती भयंकर आहे, याचा पुरावा देत होत्या. 

( नक्की वाचा : Triple Murder नीलगाय नव्हे, कुटुंब पुरले! वन अधिकाऱ्याने कशी आणि का केली पत्नी-मुलांची हत्या, वाचा थरारक कहाणी )
 

72 तासांत आरोपी गजाआड

घटनेनंतर शेजाऱ्यांनी जखमी कमला देवींना तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुरुवातीला, कुटुंबीयांनी रुग्णालयात अपघाताची खोटी माहिती दिली, पण पोलिसांना लवकरच या प्रकरणाचं गांभीर्य समजलं.

बानसूर सीओ मेघा गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवीन पोलिस स्टेशन प्रमुख रजनी कुमारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं. जिल्हा पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार विश्नोई यांच्या निर्देशांनुसार, पोलिसांनी 72 तासांत फरार आरोपी राहुल शर्माला (वय 28) मोठ्या प्रयत्नानंतर अखेरीस अटक केली.

Advertisement

बेरोजगारी आणि अनियंत्रित रागातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण नारायणपूर भागात मोठी खळबळ उडाली असून, लोक अजूनही हादरले आहेत. आरोपी राहुल शर्माला न्यायालयात हजर केलं असता, त्याला न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.