जाहिरात

नेटफ्लिक्सचा 'Money Heist' फिका! RBI अधिकारी बनून टाकला 5.76 कोटींचा दरोडा, मोबाईल बंद, भाषा गुप्त, पण...

Bengaluru Money Heist: एखाद्या नेटफ्लिक्स सीरिजलाही लाजवेल अशा हाय-टेक पद्धतीने 5.76 कोटी रुपये लुटणाऱ्या मास्टरमाईंड टोळीचा बंगळूरु पोलिसांनी अवघ्या 60 तासांत पर्दाफाश केला आहे.

नेटफ्लिक्सचा 'Money Heist' फिका! RBI अधिकारी बनून टाकला 5.76 कोटींचा दरोडा, मोबाईल बंद, भाषा गुप्त, पण...
Bengaluru Money Heist: या दरोड्यासाठी आरोपींनी तब्बल 3 महिन्यांची योजना आखली होती.
मुंबई:

Bengaluru Money Heist: एखाद्या नेटफ्लिक्स सीरिजलाही लाजवेल अशा हाय-टेक पद्धतीने 5.76 कोटी रुपये लुटणाऱ्या मास्टरमाईंड टोळीचा बंगळूरु पोलिसांनी अवघ्या 60 तासांत पर्दाफाश केला आहे. या दरोड्यासाठी आरोपींनी तब्बल 3 महिन्यांची योजना आखली, 15 दिवस रेकी केली आणि पकडले जाऊ नये म्हणून मोबाईल फोनचा वापरही टाळला होता. 19 नोव्हेंबर 2025 रोजी बंगळूरुच्या रस्त्यांवर घडलेल्या या थरारक ‘एटीएम कॅश-व्हॅन दरोड्या'ची स्क्रिप्ट आणि त्यात सामील असलेल्या लोकांची माहिती आता पोलिसांनी उघड केली आहे.

काय आहे प्रकरण?

19 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 12:48 वाजता ही घटना घडली. सीएमएस (CMS) कंपनीची कॅश व्हॅन, ज्यामध्ये तब्बल 7.11 कोटी रुपये रोख रक्कम होती, ती अशोक पिलर, जयनगर डेअरी सर्कलजवळ दरोडेखोरांनी अडवली. आरोपींनी 'आरबीआय (RBI) अधिकारी' असल्याचे नाटक केले आणि शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यांनी कॅश बॉक्स लुटले आणि 1:16 वाजेपर्यंत गाडी सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेनंतर सिद्धापुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासाला मोठे यश

बंगळूरु पोलिसांनी या हाय-प्रोफाईल डकैतीचा छडा लावत 60 तासांच्या आत 3 मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीतील 5.76 कोटी रुपये हस्तगत केले आहेत. या प्रकरणात केवळ बाहेरील लोकच नव्हे, तर कंपनीतील आणि पोलीस दलातील लोकांचाही समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे.

( नक्की वाचा : Shocking: 9 वर्षांची चिमुरडी 45 मिनिटे कळवळत राहिली; पण शिक्षकांनी ... 'त्या' आत्महत्येवर धक्कादायक खुलासा )

'इनसायडर'ची मदत

या दरोड्यात काही अंतर्गत (Insider) व्यक्तींचा सहभाग होता. पोलिसांना अटक केलेल्या आरोपींनाही खास भूमिका होती.

सीएमएस कंपनीचा कर्मचारी:  या व्यक्तीवर कॅश व्हॅनच्या हालचालीची आणि मार्गाची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे.

सीएमएसचा माजी कर्मचारी: त्याने कंपनीतील सुरक्षा प्रक्रिया आणि गोपनीय अंतर्गत माहिती दरोडेखोरांना पुरवली. त्याने कंपनी सुमारे 1 वर्षापूर्वी सोडली होती, तरीही तो जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होता.

पोलिसातील कॉन्स्टेबल: गोविंदपुरा पोलीस स्टेशनमधील या कॉन्स्टेबलवर दरोड्यासाठी 'जमिनीवर मदत' (On-ground assistance) आणि गुप्तचर सहकार्य (Intelligence Support) पुरवल्याचा आरोप आहे.

अशी रचली होती 'मनी हाइस्ट'ची खतरनाक योजना

या टोळीने दरोड्याचं अतिशय बारीक नियोजन केले होते.

दीर्घकाळ नियोजन: दरोड्याचा कट 3 महिने आधीच आखला गेला. त्यांनी व्हॅनच्या मार्गाची सातत्याने रेकी (Reconnaissance) केली.

तंत्रज्ञानापासून फारकत: ट्रॅकिंग (Tracking) पासून वाचण्यासाठी आरोपींनी आपले मोबाईल फोन घरीच सोडून दिले होते, जेणेकरून त्यांचे लोकेशन ट्रेस होऊ नये. तपासात दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला आणि नंबर प्लेट्स वारंवार बदलल्या.

गुप्त भाषा: तपास यंत्रणांना गोंधळात पाडण्यासाठी आरोपींनी एकमेकांशी वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधला.

टोळीचा आकार: पोलिसांना संशय आहे की, या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एकूण 6 ते 8 लोक सामील होते.

( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )

पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

बंगळूरुचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी इनसायडर लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले आणि सर्व आरोपी बंगळूरुचे असल्याचे सांगितले. या तपासासाठी कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवासह अन्य राज्यांमध्ये 30 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली.

या तपास पथकामध्ये 11 पोलीस निरीक्षक (PI), 2 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि 6 सीसीबी (CCB) अधिकारी यांचा समावेश होता. आयुक्त सिंह यांनी सांगितले की, सीएमएस कॅश व्हॅनने आरबीआयच्या अनेक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले होते, ज्यामुळे ही सुरक्षा धोक्यात आली.

दरोड्यासाठी वापरलेलं एक वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबरोबर रोख रक्कम ठेवण्यासाठी वापरले गेलेले काही ट्रंक (Trunks) देखील हस्तगत केले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सीएमएस कंपनीच्या प्रमुखांना बोलावून त्रुटींवर चर्चा करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

या गुन्ह्याचा जलदगतीनं तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी बंगळूरु पोलीस पथकाचे कौतुक केले आणि त्यांना 5 लाख रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com