Crime News : पत्नीशी वाद, काकीशी जवळीक; अवघ्या 24 तासात खळबळजनक हत्याकांडाचा मोठा खुलासा

पोलिसांनी एक खळबळजनक हत्याकांड अवघ्या २४ तासात उघडकीस आणलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

Crime News : पोलिसांनी एक खळबळजनक हत्याकांड अवघ्या २४ तासात उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणात मृत तरुणाचा सख्खा काका अशोक रॅगरला अटक केली आहे. ही घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून समोर आली आहे. बालिका वसतिगृहाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. 

१०० हून अधिक CCTV फुटेजचा घेतला शोध...

२१ जुलै रोजी पोलिसांना एका हत्येची सूचना मिळाली होती. तरुणाचा मृतदेह एका तलावाजवळ आढळून आला होता. त्याच्या गळ्यावर व्रण होते. मृतदेहाची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. यानंतर टीमने घटनास्थळावरील पुरावे जमा करीत हत्येचा गुन्हा दाखल केला. काही वेळानंतर मृतची ओळख पटली, सौरभ रैगर असं तरुणाचं नाव आहे. यानंतर परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. 

Advertisement

काकीशी जवळीक असल्याचं संशय, त्यातून घडलं खूनी कांड...

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सौरभचं त्याच्या पत्नीसोबत भांडण सुरू होतं. दोघांमध्ये दुरावा आला होता. यादरम्यान सौरभचे काकीसोबत जवळचे संबंध निर्माण झाल्याच्या काकाला संशय होता. या संशयातून त्याने सौरभच्या हत्येचा प्लान आखला. आरोपी सौरभसोबत दारू पार्टी करण्याच्या बहाण्याने एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. दारूच्या नशेत धुंद झाल्यावर काकाने त्याला एका तलावाजवळ नेलं. दारूची बाटली फोडली आणि त्याच्या मानेवर वारंवार वार केले. गंभीर जखमांमुळे सौरभचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, संशय टाळण्यासाठी आरोपी घरी परतला आणि काहीच घडलं नाही असं दाखवित सामान्यपणे वागू लागला.

नक्की वाचा - मोबाइलच्या बॅटरीशी खेळ ठरला जीवघेणा; 15 वर्षांच्या लोकेशचा आक्रोश, चेहरा रक्तबंबाळ, ओळखता येईना...जागीच मृत्यू

मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीनंतर २४ तासांच्या आत हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अशोक रॅगर याला अटक केली आहे आणि पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


Topics mentioned in this article