जाहिरात

'मी SDM आहे...'; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला थोबडवलं, त्यानंतर जे घडलं CCTV व्हायरल

SDM petrol pump video: सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून लोक हैराण आणि नाराज झाले आहेत.

'मी SDM आहे...'; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला थोबडवलं, त्यानंतर जे घडलं CCTV व्हायरल

Petrol Pump SDM Viral CCTV Footage: सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून लोक हैराण आणि नाराज झाले आहेत. हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटातील सीन नाही. तर ही खऱ्या आयुष्यातील कहाणी आहे. येथील एक (एसडीएम) उपविभागीय दंडाधिकारी
साहेब पेट्रोल पंपावर पोहोचले आणि काही क्षणात प्रकरण इतकं वाढलं की एकाला थोबडवण्यापर्यंत पोहोचलं. 

व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

एसडीएम आधी पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याशी वाद घालतात. त्यानंतर आणखी एक कर्मचारी तेथे येतो. अचानक त्याच्या कानशिलात लगावतात. यानंतर कर्मचारीही त्यांना प्रत्युत्तर देतो. यादरम्यान त्यांची पत्नी कारमधून बाहेर येते आणि कर्मचारी तेथून निघून जातो. ३५ सेकंदाचा हा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे. 

SDM आहे मी...

व्हिडिओमध्ये एसडीएम साहेब अधिकृतपणे स्वत:ला एसडीएम म्हणवून घेतो. तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर  नाराज होतो. माझी गाडी इथं लावली आहे ना, असं म्हणत त्याला कानशिलात लगावतो. इतकच नाही तर दुसऱ्या कर्मचाऱ्यावरही हात उचलतात. व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 


एसडीएमचं प्रत्युत्तर व्हायरल...

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीएम साहेबांनी लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  पेट्रोल पंप कर्मचाने त्यांच्या पत्नीला घाणेरडे इशारे केले, त्यामुळे रागाच्या भरात मी हात उचलला. या स्पष्टीकरणावर लोक संतापले आहेत. एका युजरने लिहिलंय, इतकं घाणेरडं कारण तर आम्ही पाचवीत असतानाही दिलं नव्हतं. सोशल मीडियावर एसडीएमच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com