Vigilance Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरी पैशांची 'खाण'!, रोकड अन् सोन्याचा ढीग मोजता मोजता अधिकारी थकले

या अधिकाऱ्याने 2004 मध्ये केवळ 8,000 रुपये पगारावर कनिष्ठ खाण अधिकारी म्हणून नोकरी सुरू केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती यांच्या घरावर छापा टाकून चार कोटी पेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली
  • मोहंती यांच्या घरातून 130 ग्रॅम सोनं आणि भुवनेश्वरमधील आलिशान फ्लॅटसह अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत
  • मोहंती यांनी कनिष्ठ अधिकारी म्हणून २००४ मध्ये नोकरी सुरू केली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Bribery Case: भ्रष्टाचाराचा आरोप सरकारी अधिकाऱ्यांवर वारंवार लागत आले आहेत. अनेक अधिकारी तर भ्रष्टाचारातून गब्बर झाले आहेत. अनेकांवर आतापर्यंत आपण कारवाई ही झालेली पाहीली आहे. असं असलं तरी अनेक अधिकारी आज ही भ्रष्टाचाराच्या दलदलीत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर ओहिशात समोर आला आहे. ओडिशामधील खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात 4.27 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Vigilance Department) मंगळवारी रात्री मोहंती यांना अटक केली होती. केवळ रोकडच नाही तर मोठं सोन्या चांदीचं मोठं घबाड या रेडमध्ये सापडलं आहे.  

या कारवाईनंतर त्यांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. ओडिशा राज्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचे सतर्कता विभागाचे संचालक यशवंत जेठवा यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहंती यांच्या भुवनेश्वर येथील फ्लॅटमध्ये नोटांची बंडले चक्क ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवली होती. 4.27 कोटींच्या रोकडीसोबतच 130 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. भुवनेश्वरमध्ये एक दुमजली इमारतही जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मोहंती यांनी 2004 मध्ये केवळ 8,000 रुपये पगारावर कनिष्ठ खाण अधिकारी म्हणून नोकरी सुरू केली होती.

नक्की वाचा - Shocking news: नोकरीचे आमिष, ड्रग्ज अन् धर्मांतर! सख्ख्या बहिणींच्या काळ्या साम्राज्याची हादरवून टाकणारी कहाणी

मोहंती यांच्यावर 2009 मध्येही भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. ज्याचा खटला अद्याप सुरू आहे. तरीही एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून 30,000 रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे राज्यातील खाण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या 10 बँक खात्यांची आणि लॉकरची तपासणी सध्या सुरू आहे. या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "तथाकथित डबल इंजिन सरकारच्या काळात भ्रष्टाचार कशा प्रकारे फोफावला आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे," असा आरोप त्यांनी केला. 

नक्की वाचा - Holi News: होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट! 'अशी' करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख

30,000 रुपयांची लाच घेताना पकडलेल्या या अधिकाऱ्याच्या घरातून इतकी मोठी माया कशी सापडली, यावर आता चर्चा रंगली आहे. मोहंती यांच्या नावावर 10 बँक खाती, लॉकर आणि अनेक भूखंड असल्याची माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरमधील त्यांच्या आलिशान घराशिवाय भद्रक आणि कटक येथील कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. सध्या त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांची इतकी संपत्ती आहे की ती मोजता मोजता अधिकारी थकले आहेत. मात्र एक साधा अधिकारी इतकी माया कशी काय गोळा करू शकतो याची ही चर्चा सगळीकडे रंगली आहे. 
 

Advertisement