- भोपाळमध्ये अमरीन आणि आफरीन या बहिणींनी गरजू मुलींना नोकरीचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी वापरले
- पीडित तरुणींवर सक्तीने धर्मांतर आणि बलात्काराचे गंभीर आरोप या प्रकरणातील आरोपींवर ठेवण्यात आले आहेत
- या दोघींच्या काळ्या धंद्यामुळे झोपडपट्टीतील गरीब मुलींपासून आलिशान व्हिलामध्ये त्यांचा प्रवास झाला आहे
'कोणताही धंदा छोटा नसतो' या फिल्मी संवादाचा आधार घेत भोपाळमध्ये अमरीन आणि आफरीन या दोन सख्ख्या बहिणींनी अनैतिक व्यापारातून स्वतःचे नशीब बदलले. मात्र, एका ब्युटिशियनने केलेल्या तक्रारीनंतर या दोघींच्या पापाचा घडा भरला आहे. केवळ देहव्यापारच नव्हे, तर सक्तीने धर्मांतर आणि बलात्काराचे गंभीर आरोप या प्रकरणातील आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. त्यांनी या आपल्या काळ्या धंद्याच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं केलं होतं. झोपडपट्टी ते अलिशान व्हिला असा त्यांचा या काळ्या धंद्यातूनच प्रवास झाला. त्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.
छत्तीसगडमधील एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमरीन आणि आफरीन यांनी तिला डिसेंबर 2025 मध्ये अहमदाबादला नेले. जिथे त्यांच्या नातेवाईकांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर भोपाळमधील एका दुसऱ्या तरुणीनेही अमरीनचा प्रियकर चंदन यादव याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. ब्युटिशियनने पोलिसात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तिला नोकरीचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तिला धर्म बदलण्यास भाग पाडले गेले. यानंतर अमरीनच्या घरी काम करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणीनेही चंदन यादव याने अत्याचार केल्याची तक्रार दिली. या तक्रारींमुळे अमरीन, आफरीन आणि चंदन यांचे कारस्थान उघड्यावर आले.
नक्की वाचा - Holi News: होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट! 'अशी' करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख
अब्बास नगरमधील साध्या झोपडीत राहणाऱ्या या बहिणी अल्पावधीतच 'सागर रॉयल व्हिला'सारख्या पॉश भागातील आलिशान बंगल्यात राहायला गेल्या. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या बहिणी गरीब मुलींना 10 हजार रुपयांच्या नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत असत. त्यानंतर त्यांना पब आणि क्लबमधील पार्ट्यांमध्ये नेऊन अंमली पदार्थ दिले जात. देहव्यापारास प्रवृत्त ही केले जात असे. या प्रकरणाचे धागेदोरे आता मुंबई आणि गुजरातपर्यंत पोहोचले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अमरीन आणि आफरीन या दोन सख्ख्या बहिणी मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. या दोघींनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप असून, या रॅकेटचे जाळे आंतरराज्यीय स्तरावर पसरले आहे.
या बहिणींचे टार्गेट असायच्या गरजू आणि गरीब मुली. राहण्याची सोय आणि चांगल्या पगाराचे स्वप्न दाखवून त्यांना घरी आणले जायचे. त्यानंतर त्यांना एमडी (MD) सारखे अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार केला जायचा. इतकेच नाही तर पीडित मुलींवर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या बहिणींच्या आलिशान व्हिलामागे देहव्यापाराची मोठी कमाई होती. या रॅकेटचे कनेक्शन मुंबई आणि गुजरातशी जोडले गेले असल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून बिलाल, चानू आणि यासिर या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world