Renukaswamy Murder Case : कर्नाटक पोलिसांनी संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या रेणुकास्वामी अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात कन्नड सुपरस्टार दर्शनचा (Kannada superstar Darshan) सहभाग असल्याचा ठपका ठेवलाय. दर्शननं रेणुकास्वामीचा हत्येपूर्वी क्रूर आणि अमानवी पद्धतीनं छळ केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय. दर्शनला या प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'प्रायव्हेट पार्ट' ला विजेचे झटके
'दर्शन आणि गँगनं सातत्यानं छळ केल्यानं रेणुकास्वामीच्या छातीचे हाड मोडले होते. त्याच्या शरीरावर एकूण 39 जखमा आढळल्या. इतकंच नाही तर पीडित व्यक्तीच्या डोक्यावर डोक्यावर खोल कट आढळला आहे, ' असं या चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
या गँगनं रेणुकास्वामीच्या प्रायव्हेट पार्टला विजेचे झटके देण्यासाठी इलेक्ट्रिक डिव्हाईसचा वापर केला, असंही या चार्जशिटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दर्शन आणि त्याच्या टोळीनं रेणुकास्वामीच्या टेस्टाइलचे (अंडकोष) नुकसान करण्यासाठी मेगर डिव्हाईसचा वापर केल्याचा या आरोपपत्रात उल्लेख आहे.
( नक्की वाचा : अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय? )
अमानवी पद्धतीनं छळ
या प्रकरणाशी संबंधित आणखी एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुकास्वामीची हत्या करण्यापूर्वी त्याचा यापूर्वी कधीही ऐकला नसेल अशा पद्धतीनं छळ करण्यात आला. हत्येनंतर दर्शन आणि त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रभाव आणि पैशांचा वापर करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या प्रकरणातील आरोपातून सुटका करण्यासाठी इतरांना यामध्ये गोवण्याचाही प्रयत्न केला असंही या आरोपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दर्शन आणि गँगनं गुन्हा करण्याच्या हेतुनं या प्रकरणातील फिजिकल,टेक्निकल आणि शास्त्रीय पुरावे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असंही सुत्रांनी स्पष्ट केलं.
कन्नड सुपरस्टार दर्शन या आरोपपत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडासह 14 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दर्शनला जामीन मिळावी म्हणून त्याच्या वकिलांची टीम प्रयत्न करत आहे. पण, त्याच्यावर तुरुंगात लग्झरी वागणूक मिळाल्याचा नवा आरोप दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनला जामीन मिळणे इतके सोपे नसेल, असं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world