कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या 17 सहकाऱ्यांना रेणुकास्वामीच्या हत्ये प्रकरणी 8 जूनला चित्रदुर्ग इथून अटक करण्यात आली. असे असले तरी 10 दिवसानंतरही रेणुकास्वामीचा खून एक रहस्य बनून राहीला आहे. हा खून कोणी केला? कसा केला? आणि या खूनात कोण कोण सहभागी होते या बाबत पोलिसांनी अजूनही काही स्पष्ट केलेले नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर यासह अन्य ठोस पुरावे पोलिसांच्या हाताला लागले आहे. त्यामुळे अभिनेता दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा या प्रकरणात चांगलेच अडकणार अशी स्थिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेणुकास्वामीला शॉक दिला गेला?
कर्नाटक पोलिसांनी रेणुकास्वामी हत्याकांडात कन्नड सुपर स्टार दर्शनसह 19 जणांना अटक केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपी राजू उर्फ धनराजला अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त एस. गिरीश यांनी दिली. रेणुकास्वामी हा अभिनेता दर्शन याचा फॅन होता. या प्रकरणात राजूला अटक करण्यात आल्यानंतर त्याने काही धक्कादायक खुलासे पोलिसांकडे केले आहेत. त्याने सांगितले की अभिनेता दर्शन आणि आपला काही एक संबध नाही. या प्रकरणातला एक आरोपी नंदीश याचा राजू हा मित्र आहे. नंदीश हा दर्शनचा मोठा चाहता आहे. याच नंदीशने राजू कडून एक इलेक्ट्रॉनिक यंत्र घेतले होते. त्याच्या सहाय्यानेच रेणुकास्वामीला विजेचे झटके देण्यात आले. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून समजत आहे. ही माहिती राजूच्या चौकशी दरम्यान समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले.
रेणुकास्वामीच्या अपहरणासाठी वापरलेली कार जप्त
रेणुकास्वामीच्या खूनाचा तपास करताना पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. या कार मधूनच त्याचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणात कन्नट चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार दर्शन थूगुदीप आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडा मुख्य आरोपी आहेत. जे आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्या पैकी एकाने ही कार चित्रदुर्ज जिल्ह्यातील अय्यानहल्ली गावात ही गाडी लपवली होती. ही कार जप्त करण्यात आली त्यावेळी फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते. या कारमधून अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - वसईत भर रस्त्यात तरूणीचा खून, हत्या केल्यानंतर त्याने...
अभिनेत्री पवित्राने रेणुकास्वामीवर केला पहिला वार
रेणुकास्वामी हा अभिनेता दर्शनचा चाहता होता. त्याने अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक कमेंट केली होती. हे करत असताना त्याने अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला होता. शिवाय आक्षेपार्ह गोष्टीही पोस्ट केल्या होत्या. त्याचा राग पवित्रा आणि दर्शन यांच्या मनात होता. त्यानंतर ज्यावेळी रेणुकास्वामीचे अपहर करण्यात आले. त्यावेळी सर्वात आधी त्यावर वार हा अभिनेत्री पवित्राने केला. याची कबुलीही तिने दिल्याचे सुत्रांकडून समजते. दरम्यान या प्रकरणी पोलिस आणखी एका अभिनेत्याला साक्षिदार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.
ट्रेंडिंग बातमी - राहुल गांधींनी वायनाड सोडताच काँग्रेसचा मित्रपक्ष संतापला
पोलिसांकडे दर्शन आणि पवित्रा विरोधात ठोस पुरावे
रेणुकास्वामीच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. त्याला जबर मारहाण झाली होती. त्याचा खून नियोजन करून केला होता. हे नियोजन कसे केले गेले याचे पुरावेच पोलिसांनी एकत्र केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दर्शन आणि पवित्रा यांचे कॉल रेकॉर्डस मिळवले आहेत. त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अडचण येणार नाही. दरम्यान आणखी काही पुरावे हाती लागतात का? यासाठी पोलिस दर्शनला त्याच्या आर. आर. नगर इथल्या घरी घेवून गेले होते. तिथून ही काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पुढील तपासात त्याची मोठी मदत होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानी खेळाडूची छपरीगिरी; भररस्त्यात फॅनसोबत भिडला, कारण...
आणखी एक साक्षिदार पोलिसांना सापडला?
या प्रकरणी पोलिसांनी कन्नड अभिनेता चिक्कन्ना याचीही जवळपास एक तास चौकशी केली आहे. चिक्कन्ना कन्नड चित्रपट सृष्टीत एक विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रकरणात चिक्कन्ना यांना साक्षिदार बनवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी अभिनेता दर्शन बरोबर चिक्कन्ना होता. त्यामुळे त्या रात्री काय काय झाले याची माहिती चिक्कन्नाकडून पोलिस घेत आहेत. त्याच्याकडून काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. रेणुकास्वामी याने अभिनेत्री पवित्रा गौडा हिला अश्लिल मेसेज केले होते. त्यामुळे दर्शन संतापला होता.