सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोप पोलिसांना चकवा देत होता. अखेर त्याला मध्य प्रदेशात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सैफवर हल्ला करणारा संशयीत आरोपी हा ट्रेनने प्रवास करत आहे. त्यानंतर लोकल पोलिसांना संपर्क करून या हल्लेखोराला ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सध्या पोलिस चौकशी करत आहेत. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणा विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
आरपीएफच्या सुत्रानुसार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून हा संशयीत प्रवास करत होता. त्याला याच ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचं नाव आकाश आहे. मुंबई पोलिसांनी त्याचे नाव, त्याचा फोटो आणि तो ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्याचा क्रमांकही आरपीएफला पाठवला होता. त्यानुसार त्याला पकडण्यात आले आहे. सध्या तो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.
सैफ अली खानवर 16 जानेवारीला हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिस हल्लेखोराच शोध घेत आहेत. पण त्यांना तो सापडला नाही. या बाबत अनेक लोकांची चौकशीही करण्यात आली. हल्लेखोराचा फोटो आणि सीसीटीव्ही मुंबई पोलिसांकडे आहे. त्या आधारे शोध सुरू आहे. त्यातूनच संशयीताला मध्य प्रदेशातून पकडण्या आले आहे. मुंबई पोलिस या संशयीताची चौकशी करणार आहेत. आता पर्यंत मुंबई पोलिसांनी जवळपास 50 जणांची चौकशी केली आहे.
या प्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी जवळपास 35 पथकं काम करत आहेत. पण त्यांच्या हाताला फोटो आणि सीसीटीव्ही पेक्षा जास्त काही लागलं नाही. आता एका संशयीताला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या चौकशीतून काय समोर येतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई पोलिस याचा आता ताबा घेतली. हल्लेखोर मुंबईच्या रस्त्यांवरही वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये दिसला होता. शिवाय तो कपडेही बदलत होता.