मराठा आरक्षणाचा वाद अजुनही मिटलेला नाही. मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे. त्यांचा समावेश ओबीसीमधून करावा. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागण्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सध्या तरी सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यात आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य मराठा आरक्षणाबाबत केलं आहे. त्यांच्या यावक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा हा कुणबी नाही. कोणत्याही मराठ्याला कुणबी बोलून घेणं आवडणार नाही. त्यामुळे कुणबींचे आरक्षण मराठ्यांना नको असं स्पष्ट मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. या आधी ही त्यांनी कुणबी म्हणजे मराठा नाही असं वक्तव्य केलं होतं. मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देवू नये असं म्हटलं होतं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जोरात होते. त्यावेळ राणे यांना नमतं घ्यावं लागलं होतं. अनेक मराठा समाजाच्या लोकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेतली होती.
आता नारायण राणे यांनी याबाबत परत एकदा वक्तव्य केलं आहे. कोकणात कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत. अशा वेळी कुणीही मराठा स्वत:ला कुणबी म्हणून घेणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण नको अशी स्पष्ट भूमीका राणे यांनी घेतली आहे. मागास समाज म्हणून घटनेच्या 15 आणि 16 (4) मध्ये जी प्रोव्हिजन आहे, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आरक्षण द्या असं ते म्हणाले आहे.
नारायण राणे यांच्या या मागणीने नवा वाद निर्माण होवू शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे असलेला मोठा गट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहे. शिवाय कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिली जावीत असं ही त्यांचे म्हणणे आहे. त्यात आता राणे यांनी घेतलेल्या भूमीके बद्दल मनोज जरांगे पाटील हे काय प्रतिक्रीया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. राणे यांच्या या भूमीकेला याआधीही मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world