निवडणूक ऐन रंगात येवू लागली आहे. निवडणूक जिंकायची आणि विधानसभेत पोहोचायचे यासाठी उमेदवार सर्व शक्ती पणाला लावत आहेत. अशात एक असा प्रकार घडला आहे त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. इथ चक्क जादूटोण्याचा अवलंब केला जात आहे. सांगली शहरातल्या टिंबर भागामध्ये जादूटोणा आणि भानामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बॉक्समध्ये भानामती करण्यात आलेले कवळ फळ,काळी बाहुली, फुले,अंडी आणि लिंबू आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. एका बॉक्समध्ये भानामती करण्यात आलेल्या सर्व वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्या होत्या. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या बॉक्समध्ये कन्नड अक्षरांमध्ये विरोधकांचा नाश व्हावा असा मजकूर लिहिण्यात आला होता. हा मजकूर एका कागदावर लिहीण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार कोणी केला? विरोधक म्हणजे नक्की कोण याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?
या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांनी भानामती करण्यात आलेल्या सर्व वस्तू या जाळून नष्ट केल्या आहेत. तर गेल्या तीन महिन्यात दोन ते तीन वेळा अशाप्रकारे भानामतीचा प्रकार या परिसरात घडल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांच्या वर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांच्या कडून करण्यात येत आहे. हा प्रकारा वारंवार होत असल्याने या मागे कोण आहे हे पोलिसांनी सोधून काढावा अशी ही मागणी आता नागरिकांनी केली आहे.