Sangli Crime: अरेरे! नोटांच्या बंडलात कागदाचे तुकडे, सांगलीच्या व्यापाऱ्याला 50 लाखांचा चुना

Sangli News: कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात याप्रकारणी फिर्याद दिली. या प्रकरणातील संशयितांचा पोलीस तपास घेत आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min

विशाल पुजारी, प्रतिनिधी:

Sangli  Fraud News: सांगलीतील एका बेदाणे व्यापाऱ्याला तीन अनोळखी व्यक्तींनी जवळपास 50 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीत राहणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी या बेदाणे व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून पैसे घेतले. हे पैसे परत करताना त्यांनी नोटांच्या बंडलमध्ये त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून ही फसवणूक करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीतील एका बेदाणे व्यापाऱ्याला तीन अनोळखी व्यक्तींनी जवळपास 50 लाखांचा गंडा घातला. नोटांच्या बंडलमध्ये त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून ही फसवणूक केल्याचा प्रकार आहे.. दिल्लीत राहणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी या बेदाणे व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून 50 लाख रुपये घेतले.

Beed News: मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला? महिला होमगार्डची निर्घृण हत्या

त्यानंतर दिल्लीतील अनोळखी व्यक्तीनी कोल्हापुरातील मित्राद्वारे या पैश्यांची परतफेड करताना नोटांच्या बंडलखाली कोरी कागदे देऊन फसवणूक केली. सात ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर सांगलीतील राजेश मुंदडा या व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं. त्यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात याप्रकारणी फिर्याद दिली. या प्रकरणातील संशयितांचा पोलीस तपास घेत आहेत. 

Pune News: पती पत्नी और वो! नवऱ्याच्या प्रेयसीला पत्नीने पकडलं, भर रस्त्यात अपहरणाचा थरार

Topics mentioned in this article