शरद सातपुते, सांगली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या भयंकर घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्येच तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आणखी एका शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याहून सांगलीला येणाऱ्या शिवशाही बस मध्ये रात्रीच्या दरम्यान तरुणीची विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे. इस्लामपूर येथे वैभव नामक तरुण शिवशाही बस मध्ये चढला होता, त्याने इस्लामपूर ते सांगली या प्रवासादरम्यान तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयभीत झालेल्या तरुणीने हा प्रकार सांगलीमध्ये उतरल्यानंतर बस चालक कंडक्टर प्रवाशांना यांना सांगितला . त्याच वेळी स्थानिकात उपस्थित असणारे पोलिसांनी धाव घेतली.
संशयित वैभव हा पळ काढण्याच्या तयारीत असताना प्रवाशांनी चांगला चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा वैभव वसंत कांबळे राहणार वाळवा या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. स्वारगेट प्रकरण ताजे असताना शिवशाहीमध्ये अशी घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(नक्की वाचा- Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)