
Santosh Deshmukh Murder Case Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या ज्या क्रूरतेने झाली, हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर तर संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 1500 पानांच्या आरोपपत्रातील अनेक गोष्टी अजून समोर येणे बाकी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अशातच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल NDTV मराठीच्या हाती लागली आहे. ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते. देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीमुळे त्यांचं अंग काळे निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली होती.
( नक्की वाचा : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी )
संतोष देशमुखे यांच्या शवविच्छेदन अहवालात काय?
- संतोष देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुणा
- कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा
- पोटावर मारहाण झाल्याने जखमा
- नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले
- छाती, गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमा
- छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा
- डाव्या खांद्यावर जखमा
- दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला दुखापत
- पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा
- मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे-निळे पडले
(नक्की वाचा- Santosh Deshmukh काय होते संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द? मुलगी वैभवीनं रडत-रडत सांगितलं, Exclusive Video)
संतोष देशमुख यांचे शेवटचे शब्द
संतोष देशमुख यांच्या हत्येचे भंयकर फोटो उघड झाल्यानंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वैभवीनं 'NDTV मराठी' शी बोलताना आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं. "माझे वडील शेवटी देखील सांगत होते मला माझ्या मुला-मुलींसाठी जगू द्या. मला माझ्या गावाला पुढं न्यायचं आहे. मला माझ्या गावासाठी जगू द्या", असं वैभवीने सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world