Santosh Deshmukh काय होते संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द? मुलगी वैभवीनं रडत-रडत सांगितलं, Exclusive Video

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांचे शेवटचे शब्द काय होते हे मुलगी वैभवीनं सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे भयावह फोटो काही दिवसांपूर्वी उघड झाले. हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. खुद्द धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे भंयकर फोटो उघड झाल्यानंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वैभवीनं 'NDTV मराठी' शी बोलताना आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं. माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणात झाली. ती खंडणी कुणाकडं जात होती? ती खंडणी मागायला यांना कुणी पाठवलं होतं?  हे वरदहास्तशिवाय होणे शक्य नाही. त्यांना सहआरोपी करुन कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वैभवीनं केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाली वैभवी?

'धनंजय देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय. प्रत्येकाला या गोष्टीचं दु:ख आहे. आज मला एक प्रश्न पडलाय की, हे घडतंय कशामुळे? सर्वांना वाटतंय की हा प्रकार खंडणीमुळेच झालाय. माझ्या वडिलांची हत्या करणारे लोकं खंडणी मागण्यासाठी मस्साजोगमध्ये आले होते. त्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांची हत्या झाली. ही खंडणी कुणाकडं जात होती? ती खंडणी मागायला यांना कुणी पाठवलं होतं? हे वरदहास्तशिवाय होणे शक्य नाही.

ते फोटो पाहून आम्ही निशब्द आहोत. त्याबद्दल काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही. ही खंडणी कुणाकडं जात होती हा प्रश्न आहे. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? पोलीस प्रशासनही यामध्ये काही करु शकत नाहीत, असा आरोप वैभवीनं केला.

( नक्की वाचा : Dhananjay Munde Resignation : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी )

या फोटोत राक्षस वृत्तीचे लोकं धिंगाणा करत आहेत. हसत आहेत. त्यांच्या अमानुष कृत्याला तोड नाही. जी वेळ आमच्या कुटुंबीयांवर आलीय ती इतर कुणावरही येऊ नये. माझे वडील शेवटी देखील सांगत होते मला माझ्या मुला-मुलींसाठी जगू द्या. मला माझ्या गावाला पुढं न्यायचं आहे. मला माझ्या गावासाठी जगू द्या. त्यांना कुणाचातरी हात असल्याशिवाय हे शक्य नाही. हा हात कुणाचा आहे हे सरकारनं कळवलं पाहिजे. त्यांना सहआरोपी करुन कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वैभवीनं NDTV मराठी शी बोलताना केली आहे. 
 

Advertisement