सुदर्शन घुले हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. हत्या केल्यानंतर 11 डिसेंबरलाच तो भिंवडीत आला होता. त्याच्या बरोबर त्याचे अन्य सहकारी ही होते. त्याच वेळी तो पकडला गेला असता. पण मोठ्या शिताफीने ही तो तिथून निसटला. त्यावेळी थोडी चालाखी दाखवली गेली असती तर तो त्याच वेळी गजाआड झाला असता. तो भिवंडीत कोणा कोणाला भेटला? कधी भेटला याचा तपशील आता समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले याने बीडमधून पळ काढला. त्याने थेट भिवंडी गाठले. भिवंडीतील वळगाव येथील हॉटेल दिपाली वाईन बार एंड रेस्टॉरंट येथे आधी आले. या हॉटेलमध्ये सुदर्शन घुले यांच्या गावचा रवी बारगजे हा काम करत होता. सुदर्शन घुले आपल्या साथिदारांसाठी लपण्याची जागा शोधत होता. त्यासाठी तो भिवंडीत आला होता. त्यावेळी तो डॉ.सोन्या पाटील यांच्या कार्यालयातही गेला होता.
पण तिथेही त्याचे काही झाले नाही. मात्र तिथून त्याला बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांचा पत्ता मिळाला. सुदर्शन घुले याने डोईफोडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वैष्णोदेवी येथे 8 डिसेंबरलाच गेले होते. डोईफोडे यांच्या बिअर शॉफमध्ये घुले गेला होता. त्यावेळी तो इथं आला असल्याचं डोईफोडे यांना कळवण्यात आलं. डोईफोडेंना घुले बद्दल आधीच सर्व माहित होतं. त्यांनी त्याला कोणतीही मदत करु नका. उलट पोलिसांना त्याची माहिती द्या असं सांगितलं.
काही तरी गडबड दिसते असे सुदर्शन घुलेच्या लक्षात आले. त्याने आणि त्याच्या साथिदारांनी नंतर आपण थोड्या वेळात येतो असं सांगत तिथून पळ काढला. ते परत आलेच नाहीत. सुदर्शन घुले ज्यावेळी भिवंडीत आला होता त्यावेळी नक्की काय काय झालं हे विक्रम डोईफोडे यांनी सांगितलं. आपण 8 तारखेलाच वैष्णव देवीला गेलो होतो. 11 तारखेला आपल्याला एक मेसेज आला. त्यात तुमचे पाहुणे आले आहेत असं सांगितलं. नाव आणि फोटो वरून तो सुदर्शन घुले आहे हे मला समजलं होतं. त्याचा आणि आपला तसा काही संबध नाही.
ट्रेंडिंग बातमी - Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
डोईफोडे पुढे सांगतात की, त्याच्या ओळखीचा रवी बारगजे हा आपल्या हॉटेलमध्ये काम करतो. त्यामुळे त्याने घुले आल्याचे सांगितलं. शिवाय त्याच्याबाबतची माहिती ही सांगितली. त्यावर त्याला तिथे कोणत्याही प्रकारचा थारा देवू नको असं सांगितलं. शिवाय पोलिसांना ही कळव असं सांगितलं. त्यानंतर घुले आणि त्याचे सहकारी आपण थोड्या वेळात येतो असं सांगितलं. असं सांगून ते जे गेले ते परत आलेच नाही असंही डोईफोडे यांनी सांगितलं. शिवाय सीआयडीनेही आपल्याकडून माहिती घेतल्याचे स्पष्ट केले.