जाहिरात

Suresh Dhas: मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं

पुण्यात संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Suresh Dhas:  मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं
पुणे:

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जस-जसा पुढे जात आहे, तसे काही धक्कादायक खुलासे ही होताना दिसत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी तर खुलासे करण्याचा धडाकाच लावला आहे. पुण्यात संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या आक्रोश मोर्चात त्यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी जो गौप्यस्फोट केला आले त्यात त्यांनी थेट धनंजय मुंडेच या प्रकरणात कसे आहेत. खंडणी कशी मागितली गेली, त्यासाठीची बैठकच धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर कधी आणि कोणी कोणी घेतली याचा पाढाच वाचला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाची सुरूवात एप्रिल मे महिन्यात झाली होती. नितीन बिक्कड हा सुरक्ष एजन्सी चालवणारा व्यक्ती आहे. याची आणि वाल्मिक कराड याची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी मिळून काम करण्याचं ठरलं. त्यानुसार या दोघांनी 14 जुनला परळीत धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जोशी या त्यांच्या पीए बरोबर संवाद केला. आपल्याला डावलून थेट धनंजय मुंडे यांना संपर्क केल्यामुळे वाल्मिक कराडची सटकली अशी माहिती सुरेश धस यांनी यावेळी दिली. 

ट्रेंडिंग बातमी - Anjali Damania : दररोज 700 ते 800 धमकीचे कॉल, अश्लील कमेंट; मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर मानसिक छळाचा आरोप 

त्यांनी तातडीने अवाद कंपनी आणि मुंडेंच्या पीएला झापले. त्यानंतर पुढील मिटींग मुंबईत धनंजय मुंडे यांच्या सातपूडा या सरकारी बंगल्यावर झाली. ती तारीख होती 19 जून 2024. या दिवशी सातपूडा बंगल्यावर अवादा कंपनीचे अलताफ तांबोळी, शुक्ला आणि इतर अधिकारी आले होती. त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित होते. या बैठकीत तीन कोटीच्या खंडणीची डिल फायनल झाली. त्यानंतर अलताफ तांबोळी आणि शुक्ला हे बैठकीतून बाहेर आले. त्यांनी कंपनीच्या वरिष्टांना याबाबत माहिती दिली. पुढे हे दोघे परत बंगल्यावर गेले त्यांनी तीन नाही तर दोन करोडमध्ये फायनल केले. आता निवडणुका आहेत त्यामुळे काही रक्कम द्या असं सांगण्यात आलं. त्यावेळी पन्नास लाख कंपनीने दिले. असा गौप्यस्फोटही यावेळ सुरेश धस यांनी केला.  

ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar: 'माझीच मला लाज वाटते' अजित पवार असं का म्हणाले?

या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहीजे. वाल्मिक कराडकडे 17 फोन आहेत. तो कोणाशी बोलत होता. त्याला कोण आदेश देत होते हे समोर आले पाहीजे. मी सांगत असलेली एकही गोष्ट जर खोटी निघाली तर आपण राजकारणातून सन्यास घेवू असं सुरेश धस यांनी जाहीर केलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून काढून टाकावं. जर तुम्हाला त्यांचा राजीनामा घेता येत नसेल तर त्यांना बिन खात्याचं मंत्री करा अशी मागणी यावेळी धस यांनी केली. सुरेश धस यांनी जे आरोप केले त्यातून त्यांनी पहिल्यांदाच या गुन्ह्यात थेट धनंजय मुंडे यांचा सहभाग कसा आहे हे तारखेसह सांगितले आहे. शिवाय ज्या बैठका झाल्या त्या धनंजय मुंडेंच्याच सरकारी बंगल्यावर झाल्या. त्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news : प्रेमिकेसह नवजात जुळ्या मुलींना मारले, तब्बल 18 वर्षानंतर सीबीआयच्या जाळ्यात अडकले

यावेळी त्यांनी अजित पवारांनाही विनंती केली. अजित पवार हे प्रांजळ मनाचे आहेत. त्यांचे ह्रदय हे पाच वर्षाच्या लेकरा प्रमाणे आहे. ते चुकीची गोष्ट कधी करणार नाहीत. किंवा चुकीच्या गोष्टीला कधी प्रोत्साहन ही देणार नाहीत. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहा वर्षा काम केलं आहे. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे असंही धस यावेळी म्हणाले. मी अजित पवारांच्या पाया पडतो. तुमचं येवढं त्यांच्यात काय अडकलं आहे असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने केला. त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. या केसचा निकाल लागेपर्यंत त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवा अशी मागणीच त्यांनी यावेळी पुण्यात केली. शिवाय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहीजे असंही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com