Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर, महाजन कुटुंबीयातील व्यक्तीकडूनच जमीन हडपण्याचा आरोप

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता महाजन कुटुंबीयातील व्यक्तीनंही त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या चर्चेत आहेत. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. मुंडे हेच कराडे आका (गॉडफादर) असल्याचा आरोप सातत्यानं होत आहे. विरोधी पक्षांसह महायुतीच्या आमदारांनीही मुंडे यांना लक्ष्य केलंय. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता महाजन कुटुंबीयातील व्यक्तीनंही धनंजय मुंडे यांच्यावर जमीन हडपण्याचा आरोप केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंडेंवर गंभीर आरोप

धनंजय मुंडे यांनी माझी परळीतील जागा हडपली असा गंभीर आरोप सारंगी महाजन (Sarangi Mahajan ) यांनी केला आहे. सारंगी माजी भाजपा खासदार पूनम महाजन यांच्या काकू आहेत. दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. सारंगी महाजन यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला न्याय मिळेल असा शब्द दिल्याचंही सांगितलं आहे.

( नक्की वाचा: धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )

धनंजय मुंडे माझा भाच्चा आहे. त्यांनी गोड बोलून परळीला बोलावलं आणि माझ्याकडून जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या, असा आरोप महाजन यांनी केला. आपली साडेतीन कोटींची जमीन फक्त 21 लाखांना दिली, असं त्यांनी सांगितलं.  

मी तिथं प्रचंड दहशतीमध्ये होते. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी, अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे. मी परळीच्या जनतेच्या वतीनं आवाज उठवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Advertisement
Topics mentioned in this article