म्हशींना दिलं जातंय भयंकर इंजेक्शन, दूधातून कॅन्सरचाही धोका! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan News : रोज सकाळी तुमच्या घरी येणाऱ्या किंवा तुम्ही बाजारातून विकत घेणाऱ्या दूधापासून कॅन्सर होण्याचाही धोका आहे हा विचार तुम्ही कधी केलाय का?

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, प्रतिनिधी

दूध हा रोजच्या जगण्यात रोजच्या जगण्यात नेहमी लागणारा पदार्थ आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांसाठीच दूध उपयोगी आहे. रोज सकाळी तुमच्या घरी येणाऱ्या किंवा तुम्ही बाजारातून विकत घेणाऱ्या दूधापासून कॅन्सर होण्याचाही धोका आहे हा विचार तुम्ही कधी केलाय का? कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिसरात हा धोकादायक प्रकार सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. पण, शहरातील ज्या तबेला चालकांना हे दूध पुरविले जात होते त्यावर कारवाई कधी होणार? हा प्रश्न कायम आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

ऑक्सीटोसीन इंजेक्शन प्रकरणात कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई सुरुच आहे. आत्तापर्यंत क्राईम ब्रांच पोलिसांनी 1 हजार 67 इंजेक्शन आणि इंजेक्शनला लागणारे औषधी साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणात आरोपी मसी खाेतला अटक करण्यात आली आहे. हे इंजेक्शन कल्याण,भिवंडी, उल्हासनगर शहरातील तबेल्यांना पुरविले जात होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. 

कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात ऑक्सीटोसीन इंजेक्शन तयार केले जात होते. हे इंजेक्शन म्हशीचे दूध वाढविण्यासाठी दिले जाते. त्यातून जास्त नफा मिळविला जातो. सामान्यत: म्हशी दिवसातून दोन वेळा दूध देतात. हे इंजेक्शन दिल्यावर म्हशी एका दिवसात तीन ते चार वेळा दूध देतात. हे दूध बाजारात खुलेआम विकले जाते. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर शहरातील तबेला चालकांना पुरविले जाते. 
 

Advertisement

( नक्की वाचा : वृद्ध व्यक्तींना तरुण बनवण्यासाठी इस्रायलचं 'टाईम मशिन'! बंटी आणि बबलीनं केली शेकडो लोकांची फसवणूक )

कॅन्सरचा धोका

हे दूध शरीराला हानीकारक आहे. हे दूध घेतल्यास कॅन्सरही होऊ शकतो.  शरीरातील हार्मोन्सवर त्याचा विपरित परिमाण होतो. कल्याण पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात धाड टाकली. त्या घरात 1  हजार 67 ऑक्सीटोसीन इंजेक्शन सापडली. त्याची बाजारातील किंमत 1 लाख 69 हजार रुपये आहे. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी मसी खोत याला अटक केली आहे. आरोपी मशी खोत याला पोलिस कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून कोण कोणत्या तबेला चालकाना हे इंजेक्शन तो पुरवित होता याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

Advertisement
Topics mentioned in this article