Politics News: खळबळजनक! NCP च्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक; CM फडणवीसांचा तो फोटो अन् पोस्ट भोवली

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सोशल मीडिया राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर..

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे:

Pimpri Chinchwad News:  महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सोशल मीडिया राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर..

Lungi ngidi Injury: मैदानात भयंकर घडलं! लुंगी एनगिडीची दुखापत किती गंभीर? प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी आणि कथित अतिरेकी विचारसरणीचे समर्थन केल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Advertisement

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगुडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच, तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, त्यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्री देखील शेअर केली होती. 

दरम्यान, याप्रकरणी एका वकिलाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि बालगुडे यांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत. 

VIDEO: धाड, धाड... डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, सुरक्षा रक्षकांनी वाचवले; जगात खळबळ