Crime News: मॉडल,मर्डर अन् मिस्‍ट्री! आधी खून मग अपघाताचा बनाव, पण शेवटी एका पुराव्याने 'करेक्ट कार्यक्रम'

त्यानंतर शीतलचा मोबाईल फोन बंद झाला. रविवारी सकाळी पानीपतजवळच्या कालव्यात सुनीलची कार सापडली. पण शीतल सापडली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

मॉडेल शीतल चौधरी हत्याकांडाने सर्वच जण हादरून गेले होते. पण या प्रकरणी  तिचा प्रियकर सुनीलला पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा परिसरातून एका कालव्यातून शीतलचा मृतदेह सापडला होता. शीतल एक मॉडल होती. पानीपतमधील तिच्या बहिणीसोबत ती राहत होती. 14 जून रोजी ती एका शूटिंगसाठी घरातून निघाली होती. पण घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पानीपत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सोनीपतच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की "रविवारी रात्री उशिरा कालव्यात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो मृतदेह शीतलचा होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर शीतलचा मृत्यू कसा झाला याचा शोध सुरू झाला. पोलिसांनी या प्रकरणात शीतलचा प्रियकर सुनीलवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, सुशीलने अटकेपासून वाचण्यासाठी एक मोठा कट रचला होता. शीतलचा अपघातात मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं. शीतलची बहीण नेहाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री दीड वाजता शीतलने तिला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला होता. सुनील तिला मारहाण करत आहे असं तिने सांगितलं होतं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

त्यानंतर शीतलचा मोबाईल फोन बंद झाला. रविवारी सकाळी पानीपतजवळच्या कालव्यात सुनीलची कार सापडली. पण शीतल सापडली नाही. सोमवारी सकाळी शीतलचा मृतदेह सोनीपतजवळ खरखौदा येथील कालव्यात सापडला. तो जवळपास 80 किलोमीटर वाहत गेला होता. शीतलच्या मृतदेहाची ओळख तिच्या हात आणि छातीवरील टॅटूंवरून पटली. पोलिसांनी या बाबत तपास सुरू केला. त्यात त्यांना एक सीसीटीव्ही सापडले. त्यात शीतल आणि सुनील एका गाडीत दिसत आहेत. तिच गाडी पोलिसांना कालव्यात सापडली होती. यावरून पोलिसांनी या खूनाचा उलगडा केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल

सुनील पानीपतच्या एका रुग्णालयात दाखल झाला होता. त्याने सांगितले की, त्याची गाडी कालव्यात कोसळली. त्याने हत्येला अपघात सिद्ध करण्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. सुनील विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. यामुळेच शीतलने त्याच्याशी संबंध तोडले होते. पण तो शीतलच्या मागे लागला होता. पोलिसांना शीतलच्या शरीरावर अनेक  वार आढळले आहेत. सुनीलने शीतलवर चाकूने अनेक वार केले होते. शीतल सुनीलला 6 वर्षांपासून ओळखत होती. पूर्वी ती कर्नालमधील सुनीलच्या हॉटेलमध्ये नोकरी ही करत होती.

Advertisement