Shirdi Crime: साईबाबांच्या दरबारात रक्तरंजित थरार! फळविक्रेत्या महिलेवर खुनी हल्ला; प्रकृती चिंताजनक

. रविवारी रात्री साईबाबांच्या शेजआरतीपूर्वी महाद्वार क्रमांक ४ समोरील अत्यंत वर्दळीच्या परिसरात ही घटना घडली. हल्ल्यात २६ वर्षीय जयश्री क्षीरसागर या महिला गंभीर जखमी झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shirdi Crime:  आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साईमंदिर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना घडली आहे. साईमंदिराच्या महाद्वार क्रमांक ४ समोर, शेजआरतीपूर्वी भाविकांची मोठी गर्दी असताना एका फोटो विक्रेत्या तरुणीने कैरी-काकडी विक्री करणाऱ्या महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी महिलेवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, पोलिसांनी संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री साईबाबांच्या शेजआरतीपूर्वी महाद्वार क्रमांक ४ समोरील अत्यंत वर्दळीच्या परिसरात ही घटना घडली. हल्ल्यात २६ वर्षीय जयश्री क्षीरसागर या महिला गंभीर जखमी झाली आहे.

Mumbai News : उंदरांनी खाल्लेली फळं ग्राहकांच्या ताटात? मुंबईतील धक्कादायक Video

साईबाबांच्या शिर्डीत रक्तरंजित थरार; महिला गंभीर जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री क्षीरसागर ही नेहमीप्रमाणे आपल्या कैरी-काकडीच्या ठेल्यावर व्यवसाय करत होत्या. त्यावेळी हातावर फोटो विक्री करणारी फिजा नावाची तरुणी तेथे आली. दोघींमध्ये किरकोळ वाद झाला आणि काही क्षणांतच त्याचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. फिजाने धारदार शस्त्राने जयश्री यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. सर्वत्र रक्ताचा सडा पडल्यान घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि उपस्थित भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Advertisement

घटना घडली त्यावेळी शेजआरतीसाठी हजारो भाविक मंदिराकडे येत होते. त्यामुळे काही काळ महाद्वार परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जखमी जयश्री हिला तातडीने साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिर्डी पोलिसांनी संशयित फिजा हिला ताब्यात घेतले असून, या हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच तिच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू केला आहे.

Pune News : मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, पुण्यात घडली लव्ह अफेअरची खतरनाक घटना, CCTV व्हायरल झाल्याने खळबळ

दरम्यान, जयश्री क्षीरसागर ही अनेक वर्षांपासून कैरी-काकडी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या या अवस्थेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, पतीसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, साईमंदिरासारख्या अतिसंवेदनशील आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या धार्मिक स्थळी अशा प्रकारची घटना घडल्याने मंदिर परिसरातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.