जाहिरात

Mumbai News : उंदरांनी खाल्लेली फळं ग्राहकांच्या ताटात? मुंबईतील धक्कादायक Video

मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी खेळ करणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai News : उंदरांनी खाल्लेली फळं ग्राहकांच्या ताटात? मुंबईतील धक्कादायक Video

रिझवान शेख, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी खेळ करणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील एका फळ विक्रेत्याच्या दुकानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

उंदरांनी कुडतडलेली फळं ग्राहकांच्या ताटात?

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये फळ विक्रेत्याच्या दुकानात उंदीर उघड्यावर ठेवलेली फळे खात असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उंदरांनी तोंड लावलेली आणि कुडतडलेली ही फळे कोणतीही काळजी न घेता ग्राहकांना विकली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही पैशांच्या हव्यासापोटी ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

अन्नसुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरील आणि दुकानांमधील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चांगल्या आरोग्यासाठी फळं अत्यंत महत्त्वाची असतात. मात्र बाजारात मिळणारी ही फळं अशा प्रकारे घाणेरड्या ठिकाणी ठेवली जात असतील तर प्रशासनाचे यावर नियंत्रण नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या व्हिडिओची गंभीर दखल घेत संबंधित तपास यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा व्हिडिओ बोरिवली पश्चिमेतील नेमक्या कोणत्या भागातील आणि कोणत्या दुकानाचा आहे, याची पडताळणी सध्या सुरू आहे. NDTV मराठी याबाबत कोणताही दावा करीत नाही. 

 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com