Shirdi News : साईंच्या मंदिरातील दानव अखेर सापडला! बाबांच्या झोळीतील दान करत होता लंपास

Shirdi Sai Temple News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानतील एका धक्कादायक प्रकरणात संस्थानाच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

 Shirdi Sai Temple News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या शिपायाने साईंच्या दानावरच लाखों रुपयांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चोरी करणारा आरोपी बाळासाहेब नारायण गोंदकर याला पोलीसांनी आज (शुक्रवार, 6 जून) अटक केली आहे. बाळासाहेब नारायण गोंदकर, असं या आरोपीचं नाव आहे. तो साई संस्थानामध्ये लेखा शाखेत कर्मचारी म्हणून काम करत होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

साधारण आठ दिवसांपूर्वी साई संस्थाननं सीसीटीव्ही चित्रीकरणाचा आधार घेत शिर्डी पोलीसात या घटनेची रितसर फिर्याद दिली होती.. त्यानंतर आठ दिवसापासून वेगवेगळ्या युक्त्या वापरत फरार असलेल्या गोंदकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

साई संस्थानने दिलेल्या तक्रारी नुसार एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आलाय. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने 4, 8 आणि 11 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान 500 रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेल्याच स्पष्ट झाल होतं. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान होती.

( नक्की वाचा : बायकोचा इतका द्वेष की नवऱ्यानं किटकनाशक इंजेक्शन देऊन केली हत्या! तपासात नवा खुलासा )
 

मंदिर संस्थानाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना आढळला. त्याने त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानंतर साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अखेर शिर्डी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

Topics mentioned in this article