नागपूरहून निघालेली शिवशाही बस पलटली, गाईला वाचवताना अपघात; 25 प्रवासी जखमी एकाचा मृत्यू

गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. या अपघातामुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

Advertisement
Read Time: 1 min
नागपूर:

अमरावती - नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. नांदगाव पेठ टोल नाक्याजवळी रिलायन्स पेट्रोल पंप जवळील घटना घडली आहे. नागपूरवरून अकोल्याला जाणारी बस पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातावेळी 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचंही उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. या अपघातामुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

नागपूर येथून अकोल्यासाठी निघालेली शिवशाही बस अमरावती नजीक अपघातग्रस्त झाली. अमरावती नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ टोल नाका परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ या शिवशाही बसला भीषण अपघात झाला. महामार्गावर असलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला भीषण अपघात झाला. गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरवरून अकोला जाणारी ही शिवशाही बस पटली झाली. 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.