धक्कादायक! 8 वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचार

आठ वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय वृद्धाने अत्याचार केले आहेत. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

अमरावतीच्या तिवसामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय वृद्धाने अत्याचार केले आहेत. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. मुलीचे आई वडील घरात नसल्याचे पाहून 65 वर्षाच्या वृद्धाने हे कृत्य केले. या प्रकरणी बलात्कार, विनयभंग, धमकी व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
   
ही धक्कादायक घटना 15 मे ला तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघड झाली आहे. पिडीत मुलेचे आई वडील कामासाठी शेतात गेले होते. शेतातून ते दुपारी एकच्या सुमारास घरी परत आले. त्यावेळी त्यांना आपल्या आठ वर्षाच्या मुलीचा चेहरा रडवेला दिसला. त्यामुळे तिच्या आईने तिच्याकडे याबाबत विचारणा केली. घाबरलेल्या मुलीने सुरूवातीला काही सांगितले नाही. मात्र तिला कुशीत घेऊन विचारल्यानंतर तीने गणेश कोहळे आपल्याला ओरडला असे सांगितले. 

Advertisement

हेही वाचा - शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करताय? तर सावधान! ही बातमी आधी वाचा

मात्र सायंकाळी मुलीचे पोट दुखत होते. ही बाबत तिने आईला सांगितली. मात्र उन्हामुळे मुलीला त्रास होत असेल म्हणून महिलेने त्या दिवशी तिच्या सांगण्याकडे कानाडोळा केला. पण दुसऱ्या दिवशी मुलीला आईने विचारणा केली. तुला नक्की काय होत आहे. त्यावेळी मात्र पिडीत मुलीनं झालेली सर्व हकीगत आई जवळ सांगितली. तुम्ही कामाला गेल्यानंतर आरोपी गणेश कोहळे हा दुपारी आपल्या घरी आला होता. त्यानंतर त्याने धमकी दिली. शिवाय जबरदस्तीने आत्याचारही केले. असे त्या मुलीने सांगितले. हे ऐकून त्या मुलीची आई चांगलीच हादरली. त्यानंतर मुलीला घेऊन ती थेट तिवसा पोलीस ठाण्यात धडकली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश चंपत कोहळे विरुद्ध बलात्कार, विनयभंग, धमकी, पोस्कोचा गुन्हा दाखल केलाय.

Advertisement

Advertisement