जाहिरात

Gujarat Accident : 'मी नशेत नव्हतो, पण...' बडोदा अपघाताच्या आरोपीची धक्कादायक कबुली

गुजरात अपघातातील आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Gujarat Accident : 'मी नशेत नव्हतो, पण...' बडोदा अपघाताच्या आरोपीची धक्कादायक कबुली

Gujrat Hit and Run : गुजरातमधील बडोद्यात एका जलद गतीने जाणाऱ्या कारने महिलेसह तीन जणांना चिरडलं. या अपघातात तीन जणांचा बळी गेला आहे. काही महिन्यापूर्वी पुण्यातील पोर्शे घटनेत एका श्रीमंत बापाच्या लेकाने एका दुचाकीला उडवलं आणि यात दोघांचा मृत्यू झाला. गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला असून 20 वर्षीय तरुण 120 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवित होता. रात्री साधारण 12.30 वाजता झालेल्या अपघातात तिघांचा हकनाक बळी गेला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपी तरुणाचं नाव रक्षित रवीश चौरसिया आहे. तो बडोद्यातील एका विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेतो. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील कारचा मालक असलेला आणि अपघातावेळी रक्षितच्या शेजारी बसलेला मित चौहान यालाही अटक करण्यात आली आहे. तो बडोद्याचा रहिवासी आहे आणि तो एका खासगी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. रक्षित कार चालवित असताना रक्षितच्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर दुचाकीवरील दोघेही जमिनीवर कोसळले. यानंतर कार त्यांना फरफटत पुढे नेलं. 

Crime News: अश्लील फोटो, 50 लाखांची खंडणी अन् ब्लॅकमेलिंग; माजी नगरसेवकासोबत भयंकर घडलं

नक्की वाचा - Crime News: अश्लील फोटो, 50 लाखांची खंडणी अन् ब्लॅकमेलिंग; माजी नगरसेवकासोबत भयंकर घडलं

आरोपी रक्षितने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणतीही नशा केली नव्हती. मात्र भांग प्यायल्याचं त्याने मान्य केलं आहे. त्याने पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्याकडून चूक झाली आणि पीडित कुटुंबीय देतील ती शिक्षा भोगायला मी तयार असल्याचं आरोपी यावेळी म्हणाला. अपघाताबद्दल त्याने दिलेल्या माहितीनुसार, कार चालवत असताना त्याच्या एका बाजूला दुचाकी आणि दुसऱ्या बाजूला कार होती असं आरोपीने सांगितलं. पुढे तो म्हणाले, शेजारच्या कारने आमच्या कारला धडक दिली. यानंतर कारमध्ये एअर बॅग्स उघडल्या. त्यानंतर काय झालं ते माझ्या लक्षात आलं नसल्याचं आरोपीने सांगितलं.  

कसा झाला अपघात?
हा अपघात आम्रपाली कॉम्प्लेक्सजवळ घडला. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेवेळी कारचालक नशेत असल्याची माहिती आहे. त्याने दोन दुचाकींना धडक दिली.त्यावेळी कार 120 किमी प्रतितास वेगाने होती. त्यामुळे ही धडक जबर होती. यानंतर चालकाच्या शेजारीबसलेला तरुण गाडीमधून खाली उतरला. त्यानंतर आरोपी आरडाओरडा करीत खाली उतरला. यानंतर एक और राऊंड म्हणत होता. काही वेळानंतर तो ओम नम: शिवायचा जाप करू लागला. यानंतर मात्र संतापलेल्या नागरिकांना त्याला जबर मारहाण केली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: