Teacher Murder: भयंकर! 32 सेकंदात 34 वेळा चाकूने वार; महिला शिक्षिकेच्या हत्येने शैक्षणिक वर्तुळात खळबळ

एका खासगी शाळेच्या आवारात शिरून एका महिला शिक्षिकेवर भयंकर हल्ला करत तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Teacher Murder : तरुणाने अवघ्या 32 सेकंदात तब्बल 34 वेळा चाकूने सपासप वार केले.
मुंबई:

एका खासगी शाळेच्या आवारात शिरून एका महिला शिक्षिकेवर भयंकर हल्ला करत तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा सर्व प्रकार घडला. अवघ्या 32 सेकंदात 34 वेळा चाकूने वार करून हल्लेखोराने शिक्षिकेचा जीव घेतला आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. ही संपूर्ण थरारक घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी घबराट पसरली आहे.

काय आहे प्रकरण?

हरियाणामधील फरिदाबादजवळच्या सिकरौना गावातील एका खासगी शाळेत संध्या नावाच्या महिला शिक्षिका रोजच्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आल्या होत्या. काही वेळातच एक तोंडाला रुमाल बांधलेला अज्ञात तरुण तेथे पोहोचला. त्याने शिक्षिका संध्या यांना भेटायचे असल्याचे सांगितले. निरोप मिळताच संध्या या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भेटण्यासाठी आल्या.

Advertisement

मात्र, शिक्षिका समोर येताच त्या तरुणाने कोणतीही वेळ न घालवता थेट त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. संध्या यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण नराधम एकामागून एक वार करतच राहिला.

( नक्की वाचा : Dhule News: धुळ्यात मोठा धमाका! पोलीस ठाण्यातच ACB ची रेड, खाकी वर्दीतील 2 लाचखोर अधिकारी गजाआड )

संस्था चालकालाही दिली धमकी

शाळेतील किंचाळण्याचा आवाज ऐकून संस्थाचालक तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी शिक्षिकेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र माथेफिरू तरुण हातात चाकू घेऊन त्यांच्यावरही धावून गेला. यामुळे तिथे एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली.

तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणाने अवघ्या 32 सेकंदात तब्बल 34 वेळा चाकूने सपासप वार केले. शिक्षिका जागेवरच कोसळल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )

सीसीटीव्हीत कैद झाला भयंकर प्रकार

शाळेच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. फुटेजमध्ये तोंडाला रुमाल गुंडाळलेला  तरुण आधी शाळेत येऊन काही वेळ वाट पाहत उभा असल्याचे दिसते. शिक्षिका समोर येताच तो त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांना बाहेर ओढत नेऊन चाकूने वार करू लागतो.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.