अमजद खान, प्रतिनिधी
शाळा संचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर 11 वीमध्ये शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली होती. या प्रकरणातील आरोपी शाळा संचालकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणमधील न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण तालुक्यातील निबंवली गावात राहणारे व्यावसायिक अनिल दळवी यांचा १६ वर्षीय मुलगा अनिश वरप परिसरातील सेक्रेट हार्ट शाळेत शिकत होता. अनिष आणि त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ती पोस्ट आक्षेपार्ह होती. त्यामुळे शाळेचे संचालक आल्वीन अँथोनी यांनी तिघांना कार्यालयात बोलवले. संचालकांच्या कार्यलायात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. उद्या शाळेत येऊ नका. तुमची लिव्हींग सर्टीफिकेट तुमच्या घरी येईल, असा इशारा या मुलांना संचालकांनी दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिश आणि त्याचे मित्र घरी निघून गेले. या सर्व प्रकाराचा अनिश यांनी प्रकरणाचा धसका घेतला. दुपारी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. टिटवाळा पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरु केला. या प्रकरणी अनिशच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात अँथोनी यांच्या विरोधात तक्रार दिली.
टिटवाळा पोलिसांनी अॅन्थोनी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 107 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या दोन तासांमध्येच त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना न्याायलयात हजर केले जाणार असल्याची माहिती अनिशच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी केली.
( नक्की वाचा : फोनवरुन निवृत्त मॅनेजरला घातला 72 लाखांचा गंडा, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार )
न्यायालयाच्या आवारात अॅन्थोनी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे मोठ्या बंदोबस्तामध्ये दोन उशीरा त्यांना कोर्टात सादर केले. त्यावेळी त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. अॅन्थोनी यांच्यावर शाळेत एका विशिष्ट धर्माचा प्रसार करत असल्याचाही आरोप आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.