शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राज्यात घडलेली ही पहिलीच घटना असल्याची दाट शक्यता आहे. बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातून सुद्धा अशाच प्रकारची दुर्दैवी घटना समोर येतीय. या घटनेत एका शिक्षकाने 12 वर्षाच्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले आहे. त्या पेक्षा धक्कादायक म्हणजे याच शिक्षकाला लैंगिक शोषणाच्या गुन्हात तुरूंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला. त्याच शाळेत रूजू झाला आणि पुन्हा तसाच घाणेरडा प्रकार त्याने केला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकीत विद्यालयालयात निवृत्ती काळभोर हा नराधम शिक्षक पीटीचा शिक्षक होता. त्याने विद्यालयातल्या एका 12 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. 2022 ते 2024 या कालावधीत त्याने हे कृत्य केले. शिवाय तो पीडित मुलीला जीवे मारण्याची वारंवार धमकी देत अत्याचार करत होता असा आरोप पीडित मुलीने केला आहे. ही बाब तिने आपल्या पालकांना सांगितली त्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?
याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2018 साली सुद्धा या नराधाम शिक्षकाने अशाच प्रकारे लैंगिक छळ केले होते. ती माहितीही समोर आली आहे. त्यावेळी त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर ही शिक्षक जामीनावर बाहेर आला. जामीन मिळाल्यानंतर तो त्याच महाविद्यालयात पुन्हा रूजू झाला. त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा: एका मुलीचे लैंगिक शोषण केले.
ट्रेंडिंग बातमी - 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह 15 दिवसापूर्वी जंगलात पुरला, अंगावर काटा आणणारी घटना
निगडी पोलिसांनी आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर याला अटक केलीय. तर या शिक्षकावराती अश्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा शालेय सेवत रुजू केल्याप्रकरणी विद्यालयाचे मुख्याध्यापक, ट्रस्टचे अध्यक्ष यासह अन्य सदस्यांनाही अटक केली आहे. यात एका महिला सदस्याचाही समावेश आहे. या शिक्षकाला पुन्हा सेवेत कसे घेतले याची चौकशीही पोलीस करत आहे. संस्थेने या शिक्षका विरोधात कडक पाऊलं उचलली असती तर आणखी एका मुलीचे लैंगिक शोषण झाले नसते.