जव्हारच्या आश्रमशाळेत प्रवेश, 4 दिवसांनंतर बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह पाहून खळबळ 

जव्हार येथे आदिवासी समाजाच्या मुलांसाठी सरकारमार्फत आश्रम शाळा (Tribal Ashram School) चालवल्या जातात. या आश्रमशाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min
जव्हार:

जव्हार येथे आदिवासी समाजाच्या मुलांसाठी सरकारमार्फत आश्रम शाळा (Tribal Ashram School) चालवल्या जातात. या आश्रमशाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जव्हारमधील आश्रम शाळेतल्या एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. या विद्यार्थिनीने आश्रमाच्या बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. ही मुलगी अकरावीत शिकत होती. पायल डोके असं या विद्यार्थिनीचं नाव असून यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

जव्हारच्या शासकीय आश्रमशाळा देहरेमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला. पायलला अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊन अवघे चार दिवस झाले होते. देहरे आश्रम शाळेत महिला अधीक्षिका पद रिक्त आहे. पायलला वसतिगृहात अतिरिक्त विद्यार्थिनी म्हणून ठेवलं होतं. देहरे आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने स्वत:चाच जीव घेतल्याही ही दुसरी घटना आहे. 7-8 वर्षांपूर्वी येथील एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली होती. 

नक्की वाचा - पावसात खेळू नकोस,पालकांनी खडसावले, 13 वर्षाच्या मुलीने थेट...

दरम्यान पायलने टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तिचा मृतदेह जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून जव्हार पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

Topics mentioned in this article