जाहिरात

VIDEO: समलैंगिक मावशीची भयंकर विकृती! 3 वर्षांपासून बहिणीच्याच मुलीवर... पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहा, दक्ष रहा!

मावशीच या 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करत होती. या अत्याचाराने ही मुलगी एकटी पडली,  कडक स्वभावामुळे हे कृत्य तिने तिच्या आईलाही सांगितले नाही. 

VIDEO: समलैंगिक मावशीची भयंकर विकृती! 3 वर्षांपासून बहिणीच्याच मुलीवर... पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहा, दक्ष रहा!

 lesbian aunt is sexually exploiting a minor girl: कामाच्या व्यापातून अनेकदा पालकांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं. मुलांसाठी वेळ न दिल्याने, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा न मारल्याने अनेकदा ते कोणत्या तणावात जगत आहेत याबाबत आई वडील अनभिज्ञ असतात. अशीच एक हादरवरुन टाकणारी घटना उघडकीस आली असून 17 वर्षाच्या मुलीचे तिच्या मावशीनेच शोषण केलं आहे.  मुलीच्या विचित्र वागण्याचा संशय आल्याने आई तिला एका महिला समुपदेशाकडे घेऊन गेली अन् हे भयंकर कृत्य उघडकीस आले. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा..  ( counselor shared a case about a divorced mother  & her 17yr old girl)

काऊन्सलरने सांगितली भयंकर केस

सोशल मीडियावर सध्या एका समुपदेशक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीने तिच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका घटस्फोटित महिलेची आणि तिच्या मुलीची हादरवुन टाकणारी स्टोरी सांगितली. आपल्या मुलीच्या बदलण्या वागण्यामुळे चिंतेत पडलेली आई तिला घेऊन या तरुणीच्या क्लिनिकमध्ये आली होती. माझी मुलगी वारंवार हस्तमैथुन करते ती अजून कुमारी आहे का? अशी विचारणा त्या आईने केली.

Dombivli Crime: लग्न होणार इतक्यात हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते धडकले, नवरदेव अटकेत, भयंकर कृत्य उघड

या केसबाबत काऊन्सलर तरुणीने त्यांना 45 मिनिटे समुपदेशन केले. या महिलेचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाल होते, एकाच वर्षात तिचे लग्न मोडले. घटस्फोटानंतर ही महिला मुलगीसोबत सुरत येथे आपल्या चुलत बहिणीकडे राहायला गेली. ही महिला सतत कामात व्यस्त असायची ज्यामुळे तिचे मुलीकडे दुर्लक्ष झाले. ती अत्यंत कडक आणि उर्मट स्वभावाची होती. तिला मुलं कशी सांभाळायची हेच माहित नव्हते, असं तिच्याच मुलीने सांगितले. 

विकृत मावशी, 17 वर्षांच्या मुलीचे शोषण!

ज्यावेळी या काऊन्सलर तरुणीने मुलीशी संवाद साधला त्यावेळी भयंकर सत्य समोर आले. या मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार सुरु होता. हे अत्याचार करत कोण  होते तर तिच्या आईची अविवाहित बहीण म्हणजे तिची मावशी. तीन वर्षांपासून समलैंगिक असणारी मावशीच या 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करत होती. या अत्याचाराने ही मुलगी एकटी पडली,  कडक स्वभावामुळे हे कृत्य तिने तिच्या आईलाही सांगितले नाही. 

Watch VIDEO:  व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लहान वयातच अशी विकृत घटना घडल्याने ही मुलगी मानसिक तणावाखाली वावरत होती. आता २० मार्चपासून तिची बोर्डाची परीक्षा आहे, मात्र मानसिक तणावामुळे ती मुलगी पेपरही नीट देऊ शकत नाही, असं या काऊन्सलर तरुणीने सांगितले. दरम्यान, मुलांना जर सांभाळता येत नसेल तर जन्म देऊ नका, तुम्ही दुर्लक्ष केलेली मुले कुणाच्या तरी वासनांध नजरेची शिकार होतात अशी संतप्त प्रतिक्रियाही या काऊन्सलर तरुणीने दिली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com