Mumbai News: भयंकर विकृती! गटारातून कुत्र्याचा आवाज.. नागरिक धावले अन् जे पाहिलं; घृणास्पद घटना

प्राणी कार्यकर्त्यांनी लगेच समता नगर पोलिसांना कळवले, ज्यांनी रविवारी एफआयआर दाखल केला," असे एमएडब्ल्यू फाउंडेशनच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई:

Kandivali Crime:  विकृतीचा कळस गाठणारी भयंकर घटना मुंबईमधून समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला येथील सार्वजनिक ठिकाणी एका मादी कुत्र्याला जखमी करून लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्याने संजय एम गौड नावाच्या एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे. 

कुत्र्यासोबत लैंगिक अत्याचार

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला येथे एका मादी कुत्र्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. संजय एम गौड या नराधमाने हे विकृत कृत्य केले.  स्थानिक पशुपालकांनी पेटा इंडिया आणि मार्मिक अ‍ॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनच्या मदतीने बीएनएसच्या कलम ३२५ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत एफआयआर दाखल केला.

Korean Game : गेम नव्हे, तर ‘डेथ ट्रॅप'; पालकांसाठी धोक्याचा इशारा

नऱाधमावर गुन्हा दाखल

आरोपी (गौड) ला लोखंडवाला येथील काही स्थानिक रहिवाशांनी पकडले, कारण त्यांना एका मादी कुत्र्याचा आवाज ऐकू आला होता जिच्यावर तो उघड्या गटारात लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर प्राणी कार्यकर्त्यांनी लगेच समता नगर पोलिसांना कळवले, ज्यांनी रविवारी एफआयआर दाखल केला," असे एमएडब्ल्यू फाउंडेशनच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

आश्चर्य म्हणजे, प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले की आरोपीवर फक्त 'प्राण्यांवरील क्रूरते'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण  पोलिसांनी सांगितले की सध्या नवीन कायदेशीर व्यवस्थेत अनैसर्गिक लैंगिक संबंध किंवा प्राण्यांवर बलात्कार यासारख्या कलमाचा समावेश नाही. गेल्या २ महिन्यांत या परिसरात प्राण्यांवर अत्याचाराची ही दुसरी घटना असल्याचे वृत्त आहे. जखमी मादी कुत्र्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Advertisement

Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला मात्र कोंडी कायम; नव्या अडचणीमुळे पोलीसही हतबल

Topics mentioned in this article