मुरुड हादरलं! अनैतिक संबंधाने घेतला जीव, टाकीत तरंगत होता मृतदेह

संशयित आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min
मुरुड:

लातूरच्या मुरुड शहरात अनैतिक संबंधातून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी सुनील आल्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

मृताची ओळख पटली असून अमित अशोक बनसोडे वय (26 वर्ष) असं त्याचं नाव आहे. मृताच्या डोक्याच्या मागील बाजूस तीन वार करण्यात आले. याशिवाय त्याच्या मणक्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. खून करून मृतदेह वनविभागातील पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये टाकण्यात आला.

मृत अमित बनसोडे

पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह मुरुडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह पाण्याने फुगला असल्यामुळे शवविच्छेदनासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपिविरुद्ध 103 (1), 3 (5) कलम भारतीय न्याय संहितेनुसार मुरुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

Topics mentioned in this article