Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट

Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
कल्याण:

Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे. या प्रकरणात सहा संशयित चोरटे लोणावळा रेल्वे स्थानकावर उतरले आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे.

मुंबईत गोरेगाव येथे राहणारे अभयकुमार जैन हे सोलापूरहून परतत असताना, सोलापूर ते कल्याणदरम्यान त्यांच्या दोन ट्रॉली बॅगमधील 5 किलो सोने आणि दागिने चोरीला गेले. या घटनेनंतर जैन यांनी कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 'चोरीनंतरची पळापळ'

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरी करणारे हे पाच ते सहा मास्क घातलेले लोक लोणावळा रेल्वे स्थानकात उतरताना स्पष्टपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या हातात चोरी झालेल्या जैन यांच्या दोन बॅग्स दिसत होत्या.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

लोणावळ्याला उतरल्यानंतर या चोरट्यांनी तिथून वेगवेगळ्या वाहनांनी मुंबईच्या दिशेने किंवा इतरत्र पलायन केले. याचा अर्थ, चोरट्यांनी सोलापूर ते लोणावळ्यादरम्यान कधीतरी ही चोरी केली आणि लोणावळा हे त्यांचे 'एक्झिट पॉइंट' होते.

Advertisement

सोलापूर कनेक्शन आणि पूर्व माहिती

या प्रकरणात रेल्वे क्राईम ब्रांचने सोलापूर मांढा येथील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. यामुळे या चोरीचे मूळ सोलापूरमध्ये किंवा सोलापूर-पुणे मार्गावर असल्याचा संशय आहे. तपासादरम्यान असे स्पष्ट झाले आहे की, जैन यांच्याकडे दागिने आहेत आणि ते कोणत्या गाडीने प्रवास करत आहेत, याची इत्यंभूत माहिती चोरट्यांना होती. हे केवळ योगायोगाने घडलेले नसून, एखाद्या 'इनसाईडर'ने किंवा जवळच्या व्यक्तीने ही माहिती पुरवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा या चोरीमध्ये नेमका काय सहभाग आहे, तो मुख्य आरोपी आहे की माहिती पुरवणारा, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास आणि सहाही आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Advertisement
Topics mentioned in this article