Solapur news: विष प्यायला लावलं, कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं, पुण्यानंतर सोलापूर हादरलं

दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी, रॉडच्या सहाय्याने मारल्याचा त्यांचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
सोलापूर:

सौरभ वाघमारे 
 
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना महिलां वरील घरघुती हिंसाचाराची एक एक प्रकरणं आता समोर येत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत होता. त्यातून तिने आत्महत्या केली.त्यामुळे पुणे हादरून गेले आहेत. त्यानंतर सोलापूरातही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका विवाहीतेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आलं. त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला. विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चित्रा सतीश भोसले या सोलापूरमध्ये राहातात. चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी 2007 साली झाला होता. त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला. 2014 साली तिच्या सासरच्याा लोकां विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबीयांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिली. त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या. पण त्रास काही कमी झाला नाही. आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्र यांच्या वडील आणि भावाने केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 7 दिवस 11 गावं 2 गाड्या, हगवणे बाप-लेकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून काय काय केले?

14 मेला दीर, जाऊ यांनी चित्रा यांना बेदम मारहाण केली. शिवाय त्यांना विष पिण्यासाठी दबाव टाकला. मारहाण इतकी केली की त्यात त्यांच्या कानाचा पडदा फाटला. रॉड आणि काठीने ही मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यांना त्याच अवस्थेत दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले. ज्यावेळी त्यांचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेवून गेला. त्यांना सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?

दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी, रॉडच्या सहाय्याने मारल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टेंभुर्णी पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केलेले नाही असा आरोप चित्रा यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपींना तातडीने अटक करावी शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. लग्नाच्या वीस वर्षानंतरही विवाहीतेला अशी मारहाण होत असेल तर काय करावे अशा प्रश्न चित्रा यांच्या वडीलांनी उपस्थित केला आहे.  

Advertisement