संकेत कुलकर्णी
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. अनेक वेळा अल्पवयीन मुली या टार्गेट होताना दिसत आहेत. अशीच एक सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. इथं एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले. त्याचा व्हिडीओ ही काढला गेला. त्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात एक नामांकीत वकीलाचं ही नाव समोर आलं आहे. त्याचे थेट राजकीय संबंध असल्याचं ही बोललं जात आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माढा तालुक्यात एक पंधरा वर्षाची तरुणी राहते. तिच्याशी बळजबरीने अत्याचार करण्यात आले. अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढण्यात आले. त्यानंतर या व्हिडीओची भीती दाखवत तिच्यावर वारंवरा हे अत्याचार सुरू होती. शिवाय हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी ही तिला सतत दिली जात होती. या संपूर्ण प्रकणात पाच जण होते. या मुलीला हा त्रास असह्य झाल्यानंतर तिने या सर्वां विरोधात पोलीसात धाव घेतली.
या प्रकरणात अत्याचार करणारे दोघे व त्यांना साथ देणाऱ्या अजिंक्य संगीतराव सह पाच जणांविरुद्ध पोस्को आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अजिंक्य संगीतराव याने अल्पवयीन मुलीला दमदाटी केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने वापरलेल्या कारची पूजा एका बड्या राजकीय नेत्याने केली होती. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही सध्या व्हायरल होत आहेत. त्यानंतर राजकीय वर्तूळातही या प्रकरणाबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.
माढा तालुक्यातील उपळवाटे येथे ही पिडीत तरूणी राहते. ती पंधरा वर्षेांची आहे. या मुलीवर निखिल लांडगे व शाहीद मुलानी यांनी अत्याचार केले. यानंतर अत्याचाराचा व्हिडिओ ही काढला. हा व्हिडीओ व्हायरल करू अशी मुलीला धमकी देण्यात आली. यामध्ये अजिंक्य संगीतराव या वकिलाने आपल्या क्रेटा गाडीतून जात असताना संबंधित अल्पवयीन मुलीला दमदाटी केली. शिवाय तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.