Chinni Love You : पोलीस निरीक्षकाला रक्ताने लिहिलं प्रेमपत्र, मंत्र्यांच्या नावाने धमकावलं; अखेर..

Love Story : एका महिलेने चक्क एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पिच्छा पुरवला. हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की, तिने रक्ताने पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त केलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Love Story : संजनाने आपण काँग्रेसची कार्यकर्त्या असल्याचा दावा केला. ( प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Love Story : प्रेमात पडणं ही तशी सामान्य गोष्ट आहे, पण जेव्हा हे प्रेम वेडापलीकडे जातं आणि समोरची व्यक्ती थेट कायद्याच्या रक्षकालाच लक्ष करते, तेव्हा काय होतं? एका महिलेने चक्क एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पिच्छा पुरवला. हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की, तिने रक्ताने पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त केलं.

ती एवढ्यावरच न थांबता थेट सुसाईड नोट आणि औषधांच्या गोळ्या देऊन धमकावण्यास सुरुवात केली. राजकीय वजनाचा वापर करून तिने खाकी वर्दीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण अखेर कायद्याचा फास तिच्याभोवती आवळला गेला आहे.

काय आहे प्रकरण?

हे अजब आणि तितकंच धक्कादायक प्रकरण घडलं आहे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरात. येथील राममूर्ती नगर पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर सतीश जीजे यांना गेल्या काही दिवसांपासून एका महिलेने अक्षरशः जेरीस आणलं होतं. 

( नक्की वाचा : माणुसकी मेली! रक्ताने माखलेली पत्नी ओरडत होती,पण शेकडो वाहनं निघून गेली..प्रसंग वाचून अंगावर येईल काटा )
 

19 ऑगस्ट रोजी सतीश यांनी या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात या महिलेचा प्रवेश झाला.30 ऑक्टोबरपासून संजना उर्फ वनजा नावाच्या या महिलेने त्यांच्या अधिकृत फोनवर सतत कॉल करायला सुरुवात केली. सुरुवातीला कुणाचे तरी प्रँक कॉल असावेत असं वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं, पण संजनाचा आग्रह वाढतच गेला.

Advertisement

राजकीय कनेक्शन आणि दबावाचा वापर

संजनाने आपण काँग्रेसची कार्यकर्त्या असल्याचा दावा केला. तिने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर तिने मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो पाठवून निरीक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. 

सतीश यांनी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तर आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून त्यांना अडचणीत आणण्याची धमकी तिने दिली. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांनी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही पोलीस निरीक्षकांना फोन आले.  पोलीस निरीक्षक तिचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, अशी खोटी तक्रार तिने केली होती.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

रक्ताने लिहिलेलं प्रेमपत्र आणि आत्महत्येची धमकी

7 नोव्हेंबर 2025 रोजी हे प्रकरण अधिकच गंभीर झालं. त्या दिवशी सतीश त्यांच्या केबिनमध्ये बसून लोकांच्या तक्रारी ऐकत होते, तेव्हा संजना तिथे आली आणि तिने त्यांच्या हातात एक पाकीट दिलं. 

या पाकिटात प्रेमाची कबुली देणारी 3 पत्रे आणि नेक्सिटो प्लस नावाच्या गोळ्यांची पाकिटं होती. त्यातील एका पत्रावर तिने रक्ताने हार्टचं चित्र काढलं होतं आणि त्यावर 'चिन्नी लव्ह यू' असं लिहिलं होतं. तिचं प्रेम स्वीकारलं नाही, तर ती आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार पोलीस निरीक्षक असतील, अशी धमकी तिने थेट पत्रातून दिली.

Advertisement

अखेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलीस तपासात असं समोर आलं की, या महिलेने यापूर्वीही अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे त्रास दिला होता. पोलिसांनी तिला समजावण्यासाठी तिचं घर गाठलं, पण तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी सहकार्य करण्यास नकार दिला. 

अखेर 12 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा एकदा तिने पोलीस स्टेशन गाठून आरडाओरडा केला आणि निरीक्षकांच्या प्रतिमेला तडा लावण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून पोलीस निरीक्षक सतीश यांनी रीतसर तक्रार दाखल केली. राममूर्ती नगर पोलिसांनी आता या महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी देणे आणि आत्महत्येची धमकी देऊन छळ करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article