शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा

उत्साहाच्या वातावरणादरम्यान बुलढाण्यात दगडफेकीचा प्रकार घडला आहे. (Buldhana stone pelting)

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) मिरवणुका मोठ्या वाजत-गाजत निघत आहेत. जड अंत:करणाने भाविक गणेशाला शेवटचा निरोप देत असताना पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करीत आहेत. उत्साहाच्या वातावरणादरम्यान शेगावमध्ये गडफेकीचा प्रकार घडला आहे. (Buldhana stone pelting)

शेगाव शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. या परिसरात किरकोळ वादातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत बाप्पाचं विसर्जन करणार नसल्याची भूमिका या गणेश मंडळाने घेतली आहे. त्यामुळे तब्बल दोन तासांपासून मिरवणूक एकाच ठिकाणी थांबून आहे. 

हे ही वाचा : Ganesh Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट; मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 3 बालकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारानंतर येथील गणेश मंडळ शहरातील शिवाजी चौकात थांबून राहिले आहेत. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मिरवणूक पुढे जाणार नसल्याचा पवित्रा गणेश मंडळाने घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान गेल्या दोन तासांपासून मिरवणूक एकाच जागी थांबून आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.