Student Committed Suicide: मध्य प्रदेशमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये एका सातवीच्या मुलीची वही हरवली होती. यावर वडील तिच्यावर खूप चिडले. यानंतर मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना कटारा हिल्स पोलीस ठाणे हद्दीतील ग्लोबल पार्क सिटीची आहे.
सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'Donate My Body to Anyone Who Needs Eat'
घटनास्थळावरुन सुसाइड नोट मिळाली आहे. विद्यार्थिनीने टिश्यू पेपवर सुसाइड नोट लिहिली आहे. कोणा गरजूला माझा देह दान करा. तर दुसरी सुसाइड नोट विद्यार्थिनीने वहीत लिहिली आहे. माझी खोली, कम्प्युटरसह सर्व सामान दोन्ही लहान भावांना द्याल.
समाजशास्त्र विषयाची वही हरवली होती..
विद्यार्थिनीची समाजशास्त्र विषयाची वही हरवली होती. वही हरवल्यामुळे मुलीला वडील खूप ओरडले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
(Disclaimer: आम्ही अशा कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही, एनडीटीव्हीचा असा विश्वास आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. जीवन म्हणजे पुढे जाणे, थांबणे नव्हे. तुम्ही धीर धरावा, अस्वस्थता आणि घाबरून कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. यासोबतच, पालकांनी त्यांच्या मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना योग्य दिशा दाखविणे देखील महत्त्वाचे आहे. मुलांना असे वाटू नये की ते एकटे आहेत)